Jalgaon Dasara Shopping: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनविक्री सुसाट! शहरात कोट्यावधींची उलाढाल; सोने खरेदीसाठी गर्दी, अनेकांचा गृहप्रवेश

Latest Dasara 2024 News : सुमारे शंभर चारचाकी, आठशे ते बाराशे दुचाकींची विक्री झाली तर सुमारे दोनशे जणांनी नवीन घरात प्रवेश केला. सोबतच तयार कपड्यांची मोठी विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
Customers come to buy motorcycles on the occasion of Dussehra
Customers come to buy motorcycles on the occasion of Dussehraesakal
Updated on

Jalgaon Dasara Shopping : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीला (दसरा) सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सुवर्णबाजारात शनिवारी (ता. १२) दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. दुचाकी, चारचाकी वाहने खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांची लगबग सुरू होती.

शहरातील विविध दुचाकीच्या शोरूममध्ये ग्राहकांनी अगोदरच येऊन वाहनांचा रंग, मॉडेल, त्यातील सुविधांची पाहणी केली होती. काहींनी आरक्षणही केले होते. पसंत पडलेले वाहन आज ग्राहकांनी घरी नेले. सुमारे शंभर चारचाकी, आठशे ते बाराशे दुचाकींची विक्री झाली तर सुमारे दोनशे जणांनी नवीन घरात प्रवेश केला. सोबतच तयार कपड्यांची मोठी विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (Vehicle sales booming on occasion of Dasara)

सोन्याच्या दरात पाचशेची वाढ

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिले. सोन्याच्या दरात आज पाचशे रूपयांची वाढ झाली होती. सोन्याचा दर शुक्रवारी (ता.११) ७५ हजार ८०० रूपये प्रती दहा ग्राम (विना जीएसटी) होता. आज (ता. १२) त्यात पाचशे रूपयांची वाढ होवूऊन सोने ७६ हजार ३०० वर पोचला आहे तर चांदी ९२ हजार प्रती किलोवर कायम होती.

सोन्याला मागणी कायम

सोन्याचे दर महिन्याभरात चढउतार होत आहेत. सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम ७६ हजार ३०० होता. दर वाढले ग्राहकांची सोने खरेदीला पसंती कायम असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

दोनशे घरांचे आरक्षण

साडेतीन मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त असल्याने अनेकांनी नवीन घरात प्रवेश, वाहन खरेदी, दुकान, उद्योगाचा शुभारंभ केला. यंदा शहरात सुमारे दोनशे घरांचे आरक्षण झाले होते. त्यातील सर्वांनीच मुहूर्त साधत नवीन घरात प्रवेश केला असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी सांगितली. १५ लाखांपासून पुढे तयार घरांच्या किमती होत्या.

इलेक्ट्रानिक वस्तूंचा मागणी

मिक्सर, वाशिंग मशिन, फ्रीज, आटा चक्की, फर्निचर, तयार सोफासेट, किचन सेट, एलइडी टीव्ही, मोबाईल आदींची मोठ्या प्रमाणात आज विक्री झाली. (latest marathi news)

Customers come to buy motorcycles on the occasion of Dussehra
Nashik Dasara Shopping : दसरामुळे वाहन बाजार तेजीत! 150 कोटींची उलाढाल; इलेक्ट्रॉनिक वाहनांना सर्वाधिक पसंती

बासुंदी, श्रीखंडाला मागणी

दसऱ्याला गोडधोड केले जाते. यामुळे श्रीखंड, बासुंदी, खवा, आम्रखंड, चक्का, रबडी, पेढे या गोड पदार्थांची खरेदी नागरिकांनी केली.

"विजयादशमीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. लाईट वेट दागिन्यांना मोठी मागणी होती. दिवाळीपर्यंत सोन्याला मागणी वाढतच जाणार आहे. दर काहीही असले तरी ग्राहक सोने खरेदीला पसंती देतात."- सुशील बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

"दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टरला चांगली मागणी होती. यंदा हंगाम उशिरा निघाल्याने याहीपेक्षा दिवाळीत शेतकरी वर्ग चांगली खरेदी करेल. विविध वाहनांवर विविध ऑफर्स आहे. ती ग्राहकांना मिळतेच."- किरण बच्छाव, संचालक, सातपुडा ऑटो

‘आरएसएस’चे संचलन

विजयादशमीनिमित्त आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतर्फे शहरात संचलन झाले. सकाळी आठला बिंदूबाई सोनवणे हॉल (कांचन नगर), जुने श्रीराम मंदिर व वानखेडे सोसायटी, दीक्षितवाडी या तीन ठिकाणाहून संचलन झाले. या तीनही ठिकाणाहून निघालेल्या संचलनांचा टॉवर चौकात त्रिवेणी संगम झाला.

जिल्हा न्यायालयाजवळ संचलनाचा समारोप झाला. या संचलनात सुमारे ७२५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करून व रांगोळ्या काढून संचलनाचे उत्साहात स्वागत केले. संचलन सुरू असताना रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी संचलन पाहण्यासाठी गर्दी'केली होती.

Customers come to buy motorcycles on the occasion of Dussehra
Nashik Dasara Property Shopping: दसऱ्याच्या मुहूर्तावर 900 फ्लॅटचे बुकिंग! परवडणाऱ्या घरांकडे ग्राहकांचा कल; फार्महाऊसला मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.