Jalgaon News: समांतर रस्त्यावर वाहने सुसाट! पारोळ्यात ‘अंडरपास’जवळच्या गतिरोधकांची मागणी; अपघाताला आमंत्रण

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे किंवा वाहनांची वर्दळ होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी अंडरपास करण्यात आले.
Completed service road on Bahadarpur underpass
Completed service road on Bahadarpur underpassesakal
Updated on

पारोळा : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे किंवा वाहनांची वर्दळ होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी अंडरपास करण्यात आले. हरातील वंजारी रस्ता, अमळनेर व बहादरपूर रस्त्यावर अंडरपास करण्यात आले असून, समांतर रस्तेही तयार केले आहेत तर काही समांतर रस्ते कासव गतीने सुरू आहेत. मात्र हे समांतर रस्ते तयार करताना कोणतेही गतिरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जात असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहे. (Jalgaon Demand for speed breaker near underpass in Parola news)

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी बायपास तयार करण्यात आला. म्हसवे फाटा ते श्री सत्यनारायण मंदिर असा बायपास शहराचा आहे. या बायपासला तीन अंडरपास देण्यात आले आहे. सद्यस्थितीत अमळनेर रस्त्यावरील समांतर रस्त्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, बहादरपूर रस्त्यावरील अंडरपासजवळ एकीकडे रस्ता तयार झाला आहे. मात्र समांतर रस्ता ते बहादरपूर अंडरपास येथे गतिरोधक नाही. त्याचप्रमाणे अमळनेर रस्त्याजवळील समांतर रस्त्याचे काम सुरू आहे. येथे देखील गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

दरम्यान, समांतर रस्त्यावर गतिरोधक नसल्याने पारोळा व बहादरपूरकडून येणाऱ्या वाहनांना कोणतेही नियंत्रणबाबत नसल्यामुळे येथील वाहने सुसाट वेगाने जात आहेत. दरम्यान, बऱ्याच वेळा दुचाकी व इतर चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होण्यापासून वाचविले आहेत. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (Latest Marathi News)

Completed service road on Bahadarpur underpass
Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

जीव मुठीत घालून प्रवास

पारोळा शहरातून समांतर रस्त्याकडे जाताना बहादरपूर किंवा महामार्गावर वाहने नेत असताना दुचाकी व चारचाकीस्वारांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. काही अंतरावरच हॉर्न वाजवून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. बऱ्याच वेळा अंडरपासमध्ये वाहनधारकांची तूतू-मैमै झाल्याचे दिसून आले आहे.

अनेकदा शाळकरी विद्यार्थ्यांची गतिरोधक नसल्यामुळे भंबेरी उडाली आहे. असे असताना देखील संबंधित विभागाने संमातर रस्ते करताना अंडरपासजवळ आहे हा विचार न करता सरसकट रस्ता तयार केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी या अंडसपास जवळील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ‘आखो देखा’ अनुभव घ्यावा, अशी मागणी होत आहे.

"अंडरपासजवळ गतिरोधक असणे गरजेचे आहे. वाहने ये -जा करताना दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. यावेळी संबंधित विभागाने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लागावा, हीच अपेक्षा." - प्रा. विकास सोनवणे, ज्येष्ठ नागरिक, पारोळा

Completed service road on Bahadarpur underpass
Jalgaon Eco Tourism : गारबर्डी धरणावर पर्यटकांसाठी फायबर कुटी अन् मनोरे! नाशिक वन विभागाचा पुढाकार; पाल ‘इको टुरिझम’ला गती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.