Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदार यादी, इव्हीएम बॅलट युनिट पडताळणीसह केंद्रांची निश्चिती

Assembly Election : राज्यातील विधानसभेचा कार्यकाल नोव्हेंबर २०२४ ला संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे.
Legislative Assembly Election
Legislative Assembly Electionsakal
Updated on

जळगाव : राज्यातील विधानसभेचा कार्यकाल नोव्हेंबर २०२४ ला संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवरूनही सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनानेही मतदार यादी, इव्हीएम बॅलट युनिट पडताळणीसह केंद्रांची निश्चिती केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे अकरा मतदार संघ आहेत. ३६ लाख मतदार संख्या आहे. ()

मतदान प्रक्रियेसाठी लागणारे मतदान केंद्र, अंतिम मतदार यादी व इव्हीएम बॅलट युनिटची पडताळणी केली आहे. केंद्र तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज होत आहे.

मतदार संख्येत ५० हजारांनी वाढ

जिल्ह्यात २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ३५ लाख २७ हजार ९७३ मतदार होते. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात ३ हजार ५८२ मतदान केंद्र होते. सद्यस्थितीत नवमतदार नोंदणीनुसार ३६ लाख १६ हजार ४०३ असे मतदार आहेत.

एका मतदान केंद्रावर १५०० मतदार

लोकसभेवेळी मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणारा वेळ व गर्दी पाहता विधानसभेवेळी मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी एका मतदान केंद्रावर किमान एक हजार पाचशे मतदार या संख्येनुसार मतदान केंद्र निश्चिती करण्यात आली आहे.

मतदान केंद्रही वाढले

लोकसभेत ३५ लाख मतदारांची संख्या होती. सद्यस्थितीत विधानसभा मतदानापूर्वी ४८ हजार ४३० अशी वाढलेली नवमतदार संख्या आहे. मतदार संख्या वाढ लक्षात घेता त्यानुसार जिल्ह्यातील ११ मतदार संघात ९५ मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. ३ हजार ६७७ मतदान केंद अस्तित्वात आलेले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. (latest marathi news)

Legislative Assembly Election
Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान; कधी होणार मतमोजणी?

अशी आहे केंद्रांची संख्या

विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र

जळगाव शहर--३५८

जळगाव ग्रामीण--३५३

एरंडोल-पारोळा---२९८

अमळनेर--३२५

पाचोरा-भडगाव--३५४

चाळीसगाव--३४४

जामनेर---३४२

भुसावळ--३१६

मुक्ताईनगर--३२२

रावेर-यावल--३२८

चोपडा--३३७

एकूण-- ३ हजार ६७७

Legislative Assembly Election
Assembly Elections : अहेरीत तिहेरी, की मैत्रीपूर्ण लढत? महायुती, महाविकास आघाडीपुढे निवडीचे आव्हान

मतदार यंत्र पडताळणी पूर्ण

राज्यातील महायुती शासनाचा कार्यकाल ३० नोव्हेंबर २०२४ ला संपणार आहे. त्यापूर्वी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणे गरजेचे आहे. म्हणून राज्यात १५ ऑक्टोबरपूर्वी केव्हाही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. आचारसंहिता जाहीर होताच अधिकारी, कर्मचाऱ्याचे नियुक्ती, प्रशिक्षण सुरू होणार आहे.

''विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली आहे. त्यानुसार मतदानाची केंद्रेही निश्चित केली आहेत. लोकसभेवेळी मतदानासाठी लागलेल्या रांगा व वेळ पाहता १५०० पेक्षा अधिक मतदार संख्या असेल. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करून अकरा विधानसभा मतदारसंघांत पाठविले आहेत.''- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Legislative Assembly Election
Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.