Jalgaon Erandol Vidhan Sabha : ‘स्थानिक’ असूनही करण पवारांना एरंडोलने नाकारले

Jalgaon Political News : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार स्थानिक असतानाही मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.
Karan Pawar
Karan Pawar esakal
Updated on

एरंडोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांना सुमारे २२ हजार मतांची आघाडी मिळाल्यामुळे मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार स्थानिक असतानाही मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. आमदार चिमणराव पाटील आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या लढतीत आमदारांनी बाजी मारल्याचे लोकसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. (erandol Vidhan Sabha Despite being local Karan Pawar rejected)

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विजयात आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भाजपची शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा, उमेदवार स्मिताताई वाघ यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली सहानुभूती, माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांचा भाजपमधील प्रवेश, माजी खासदार ए. टी. पाटील यांचे योग्य नियोजन विजयासाठी कारणीभूत ठरले.

लोकसभा निवडणुकीत १९९० पासून एरंडोल विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारास मिळणाऱ्या मताधिक्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात त्यांच्याबद्दल सहानुभूती दिसून आली.

भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख असलेल्या करण पवार यांनीच अचानक पक्षांतर केल्यामुळे, तसेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप नेतृत्वावर केलेल्या आक्रमक टीकेमुळे मतदारसंघात उमेदवार करण पवार यांच्याबद्दल नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या टीकेमुळे प्रचारासाठी पेटून उठल्याचे चित्र मतदारसंघात सर्वत्र दिसत होते.

अंतर्गत मतभेद बाजूला सारून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभागी झाले होते. स्मिताताई वाघ यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रचाराला सुरवात केली. आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला होता. (latest marathi news)

Karan Pawar
Nashik Lok Sabha Election : डॉ. शोभा बच्छाव यांच्या विजयाने ‘धन्वंतरी’त दिवाळी; कॉंग्रेस कमिटीत सत्कार

महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मतदारसंघात संपर्क साधला. मात्र, त्यांना मतदारांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते. मतदारसंघात कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा झाली नसताना स्थानिक महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबद्ध प्रचारामुळे स्मिता वाघ यांना मताधिक्य मिळाले.

एरंडोल शहरासह कासोदा व ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मुस्लिम समाजाच्या मतदानासाठी लागलेल्या रांगांचे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झाल्याचा परिणामही स्मिता वाघ यांना मताधिक्य मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरला. लोकसभा निवडणुकीकडे विधानसभेची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात असल्यामुळे यामध्ये आमदार चिमणराव पाटील यांनी बाजी मारल्याचे सिद्ध झाले आहे.

विधानसभा क्षेत्रातील चित्र

स्मिता वाघ (भाजप) : ९४७९२

करण पवार (शिवसेना उबाठा) : ७२७०७

मताधिक्य : २२०८५

Karan Pawar
Jalgaon Vidhansabha: भाजप जैसे थे... ‘उबाठा’सह पवार गटावर आत्मचिंतनाची वेळ! शिवसेनेची चाचपणी; कॉंग्रेस-NCPकडून ‘विधानसभे’साठी मशागत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com