Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या घटक पक्षांमधील जागावाटपाचे समीकरण जवळपास निश्चित झाले आहे.. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब व्हायचे असले तरी जळगाव जिल्ह्यातील अकरा जागांचे महायुतीचे सूत्र ठरले आहे.
त्यानुसार भाजप व शिवसेना प्रत्येकी ५ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार गट) एकमेव जागा दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यात जागावाटपाच्या बाबतीत भाजप ‘मोठा भाऊ’ ठरणार असला तरी जळगाव जिल्ह्यात भाजप- शिवसेना दोन्ही ‘सारखेच भाऊ’ असतील. (Vidhan Sabha Election 2024 BJP Shivsena 5 seats each)