Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : महाजनांच्या ‘सप्तपदी’च्या वाटचालीवर विश्‍वासाची मोहोर!

Latest Vidhan Sabha Election 2024 News : जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत अनिश्‍चितता असताना जामनेरची उमेदवारी आधीच जाहीर करणे, हा महाजनांवरील व्यक्तिश: फडणवीसांचा व पर्यायाने पक्षाचा विश्‍वास अधोरेखित करतो.
Fadnavis- Mahajan
Fadnavis- Mahajanesakal
Updated on

शुक्रवारी फडणवीसांनी जामनेरात भीमसृष्टी, शिवसृष्टीचे लोकार्पण केले. सोबतच त्यांचे मंत्रिमंडळातील सर्वाधिक निकटवर्तीय व लाडक्या असलेल्या गिरीश महाजनांची उमेदवारीही जाहीर करुन टाकली. २०२४च्या निमित्ताने महाजन विधानसभेतील त्यांची ‘सप्तपदी’ पूर्ण करण्यासाठी जामनेरच्या मैदानात सलग सातव्यांदा उतरतील.

जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत अनिश्‍चितता असताना जामनेरची उमेदवारी आधीच जाहीर करणे, हा महाजनांवरील व्यक्तिश: फडणवीसांचा व पर्यायाने पक्षाचा विश्‍वास अधोरेखित करतो. अर्थात, महाजनांच्या मतदारसंघातील संपर्क व लोकप्रियतेचेच हे प्रतीक म्हणावे लागेल. (girish Mahajan candidacy showed by fadanvis)

आचारसंहिता लागण्याच्या अगदी तोंडावर उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जळगाव जिल्हा दौरा झाला. शुक्रवारी जामनेर, अमळनेरला खरेतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा होणार होता. पण, काही कारणास्तव मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत. फडणवीस जामनेरसाठी व अजित पवार अमळनेरसाठी येतील, असे ठरले.

तसे ते दोन्ही जळगावात आलेही. पण, खराब हवामानामुळे अजित पवारांना माघारी जावे लागले. फडणवीस मात्र, जामनेरला ‘पाठ’ देऊ शकत नव्हते आणि का द्यावी? मंत्रिमंडळातील त्यांच्या लाडक्या सहकाऱ्याच्या मतदारसंघात कार्यक्रम होता. ठरल्यानुसार जामनेरातील कार्यक्रम धडाक्यात पार पडला.

मुळात, हा कार्यक्रम शिवसृष्टी, भीमसृष्टीच्या लोकार्पणाचा असला तरी या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याच्या उद्‌घाटनाचे केवळ निमित्त होते. फडणवीसांना आचारसंहिता लागण्याच्या अगदी तोंडावर जामनेरात आणून महाजनांना विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने ‘पेरणी’ करायची होती, त्यांनी ती जोरदारपणे केली.

सध्या जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये जागावाटपाचे समीकरण, इच्छुकांची गर्दी पाहता उमेदवारीबाबत अनिश्‍चितता आहे. अगदी भाजपच्या वाट्याला जाणाऱ्या जामनेरवगळता अन्य मतदारसंघांमध्येही दोन-चार इच्छुकांत उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. जामनेरात मात्र, महाजनांच्या समोर पक्षात तरी अद्याप व पुढच्या काळातही अगदी २०२९पर्यंत कुणी स्पर्धक असल्याचे दिसत नाही.

शिवाय मतदारसंघात महाजनांचा संपर्क, त्यांची लोकप्रियता, त्यांनी विकासकामांद्वारे केलेली ‘पेरणी’ या त्यांच्या जमेच्या बाजूंसमोर अन्य पर्याय आपोआपच निष्प्रभ ठरतात आणि म्हणूनच फडणवीसांनी या दौऱ्यात महाजनांच्या उमेदवारीची घोषणा करताना ‘ते केवळ अर्ज भरायला जामनेरात येतील,’ असेही सांगून टाकत त्यांच्यावर प्रचंड विश्‍वास दर्शविला. हे सांगताना फडणवीस २०२९मध्ये साधना महाजन उमेदवार असतील, हे सांगायलाही विसरले नाहीत. (latest marathi news)

Fadnavis- Mahajan
Vidhan Sabha Election: मद्य सेवन परवान्याच्या हव्यात 10 लाख प्रती! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्ककडून मागणी

जामनेर मतदारसंघ महाजनांचा व पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मतदारसंघ मराठाबहुल असतानाही अल्पसंख्य असलेले महाजन सहा टर्मपासून (१९९५) याठिकाणी सातत्याने निवडून येत आहेत. यापैकी एक-दोनदा प्रतिस्पर्धी मराठा उमेदवाराने त्यांना काट्याची लढत दिली परंतु, त्यांना पराभूत करता आले नाही.

गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणासंबंधी आंदोलन पुन्हा तीव्र होऊ लागल्यानंतर त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगेंनी महाजनांना ‘टार्गेट’ केले. गेल्यावर्षी जामनेरात त्यांनी सभाही घेतली. पण, मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीत अपेक्षा असतानाही जरांगेंचा फॅक्टर जामनेरात चालल्याचे दिसत नाही.

आता पुन्हा एकदा जरांगे महाजनांना टार्गेट करतांय. महाजनांचे पक्षातील निकटवर्तीय व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तंबूत दाखल झालेत. त्यांना उमेदवारीही मिळण्याचे व त्यामुळे ही लढत तुल्यबळ होईल, असे मानले जातेय. परिणामी, खोडपेंनाही ‘अंडरइस्टीमेट’ करून चालणार नाही.

लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील निकाल वेगळा असला तरी महाराष्ट्रात महायुतीचे टेंशन वाढविणारे परिणाम समोर आलेत, म्हणून विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होऊ शकते. ही शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून फडणवीसांनी विश्‍वास दर्शविलेला असला तरी महाजनांना गाफील राहून चालणार नाही, हे मात्र, नक्की.

Fadnavis- Mahajan
Vidhan sabha election 2024: उद्यापासून आचारसंहिता? आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक; महत्त्वाचे निर्णय होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.