Jalgaon Vidhansabha Election: विद्यमान आमदारांच्या जागांवर चर्चेची शक्यता कमीच! रावेरच्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच

Latest Jalgaon Vidhan Sabha Election 2024 News : विधानसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर विविध पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होत असताना तिसऱ्या आघाडीने नुकतीच ‘एन्ट्री’ घेतल्याने निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच रंगत आली आहे.
Vidhan sabha Election
Vidhan sabha Electionesakal
Updated on

Jalgaon Vidhansabha Election : जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात जळगाव जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांवर कुठलीही चर्चा होणार नाही, असे धोरण ठरल्याचे सांगितले जातेय. जिल्ह्यातील एकमेव रावेरची जागा महाविकास आघडीतील कॉंग्रेसकडे असल्याने त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या जागेवर आपला दावा सांगितला असून, त्यांच्याकडे दोन-तीन प्रबळ उमेदवार असल्याचेही स्पष्ट केले आहे. (little chance of discussion on seats of Existing MLas)

विधानसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर विविध पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होत असताना तिसऱ्या आघाडीने नुकतीच ‘एन्ट्री’ घेतल्याने निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच रंगत आली आहे. दोन्हीही प्रमुख आघाड्यांमध्ये तीन- तीन पक्ष असल्याने पक्षांची जागांसाठी आणि प्रत्येक जागेवर इच्छुकांची प्रचंड रस्सीखेच होणार आहे.

महायुतीच्या जागावाटपातील समीकरणात तिन्ही पक्षांचे प्राथमिकदृष्ट्या एक धोरण ठरल्याचे सांगितले जातेय. त्यानुसार ज्या जागेवर ज्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, ती जागा त्याच पक्षाकडे राहील. त्यावर जागावाटपाच्या वाटाघाटीत कुठलीही चर्चा होणार नाही. ज्या ठिकाणी विरोधी पक्षातील, अर्थात- महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील आमदार आहे, अशा जागा कुणाला सोडाव्यात, त्यावर निश्‍चितपणे चर्चा होणार आहे.

जिल्ह्यात ‘रावेर’वर चर्चा

या धोरणानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे एकमेव रावेर मतदारसंघाची जागा आहे, त्या जागेबाबत महायुतीत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाटाघाटी होण्याची शक्यता आहे.

भाजप- राष्ट्रवादीत रस्सीखेच

अनेक वर्षांपासून या जागेवर भाजप कॉंग्रेस यांच्यातच लढत झालीय. त्यामुळे ही जागा भाजपकडेच राहावे, असा पक्षाचा आग्रह आहे. त्यासाठी २००४, २०१४ अशा अलीकडच्या काळातील दोन्ही विधानसभा निवडणुकीतील विजयाचा दाखला भाजपकडून दिला जात आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या जागेवर दावा सांगताना, गेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने या वेळी या जागेवर संधी मिळावी, म्हणून आग्रह धरला आहे. (latest marathi news)

Vidhan sabha Election
Vidhan sabha Election 2024: विधानसभेत नवाब मलिक-अबू आझमी यांच्यात लढत होणार? | Politics

जिल्ह्यात एकच जागा कशी लढविणार?

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीतील संभाव्य जागावाटपात सध्याच्या धोरणानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मंत्री अनिल भाईदास पाटील आमदार असलेली एकमेव अमळनेरची जागा येते. पक्षसंघटन वाढवायचे तर राज्याच्या निवडणुकीत जिल्ह्यातील केवळ एका जागेवर लढून पक्षाचा काय फायदा, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आहे.

त्यामुळेच या पक्षाने अमळनेरसोबतच आणखी एक आणि ती म्हणजे रावेरची जागा लढविण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी २०१४ च्या निवडणुकीचा दाखलाही पक्षाकडून दिला जात असून, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून घड्याळ चिन्हावर गफ्फार मलिक लढले होते व त्यांनी तब्बल ३३ हजारांवर मते मिळविली होती. ही हक्काची मते असल्याचे सांगत राष्ट्रवादी जिल्ह्यातील ही दुसरी जागा लढविण्याची तयारी करीत आहे.

या जागेवर निवडणूक लढविण्याचा प्राथमिक प्रयोग स्थानिक नेत्यांनी काल-परवा करून पाहिला. रावेरमधील कॉंग्रेस कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांना अजित पवार यांच्या दरबारात नेत त्यांच्या उमेदवारीसह प्रवेशासाठी प्रयत्न झाले. मात्र, श्री. पवार यांनी त्यास नकार दिला. आता आणखी दोन पक्षातीलच उमेदवार उमेदवारीच्या रांगेत असल्याचे सांगितले जात आहे.

"रावेरच्या जागेसाठी आमचा पक्ष सुरुवातीपासूनच आग्रही आहे. महायुतीच्या जागावाटपातील चर्चेत आम्ही तशी मागणी करणार आहोत. आमच्या पक्षात ‘उपऱ्या’ उमेदवारांना कधीही प्राधान्य दिले जाणार नाही. रावेरचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष गणेश महाजन, रमेश नगराज पाटील यांना विश्‍वासात घेऊनच आम्ही पक्षाकडे राजेश वानखेडे, सचिन रमेश पाटील अशा नावांची शिफारस करणार आहोत."

- संजय पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस तथा चेअरमन, जळगाव जिल्हा बँक

Vidhan sabha Election
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते विधानसभा निवडणूक; मतदान अन् निकालाची संभाव्य तारीख समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.