भुसावळ : विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टपूर्वी गणवेश वाटप करण्यात यावे, असे आदेश असताना देखील अद्याप गणवेशाची प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. भुसावळ तालुक्यातील जिल्हापरिषद, नगरपालिका आणि इतर अशा पहिली ते आठवीपर्यंत ८२ शाळांतील ५ हजार ६०४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटूनही गणवेशच मिळाला नाही. स्वातंत्र्यदिनापूर्वी नवीन गणवेश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. याकडे शासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. (Waiting for free uniform for students Bhusawal Taluka)