Jalgaon Monsoon News : पावसामुळे कॉम्प्लेक्सजवळील भिंत कोसळली; अमळनेरच्या व्यवसायिकांचे 10 ते 12 लाखांचे नुकसान

Jalgaon Monsoon : शहरात मंगळवारी (ता. १८) झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्सजवळील भिंत अचानक पडली.
Wall collapsed due to accumulation of rain water.
Wall collapsed due to accumulation of rain water.esakal
Updated on

Jalgaon Monsoon News : शहरात मंगळवारी (ता. १८) झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्सजवळील भिंत अचानक पडली. यामुळे संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरून तळमजल्यातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री साडेतीनपर्यंत पंप लावून पाणी काढल्याने पाण्याची पातळी कमी झाली. मात्र, पाणी शिरल्यामुळे ४ ते ५ व्यवसायिकांचे सुमारे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले आहे. ( wall near complex collapsed due to rain in amalner )

शहरात मंगळवारी रात्री आठला जोरदार पाऊस झाला. पावसाच्या पाण्याने गटारी तुंबल्या. पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रसमंजू कॉम्प्लेक्सच्या भिंतीमध्ये मुरून काही क्षणात ही भिंत पूर्णपणे कोसळली आणि क्षणात सारे पाणी कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यामध्ये शिरूले. ४ ते ५ फूट पाणी साचले. पावसामुळे बरेच व्यावसायिक दुकान बंद करून घरी गेले होते. (latest marathi news)

Wall collapsed due to accumulation of rain water.
Jalgaon Monsoon: दिवसभराच्या उघडिपीनंतर सायंकाळी धुवाधार! सुटीचा दिवस असल्याने कुटुंबीयांसह पार्टी

घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली आणि शक्य होईल तेवढा दुकानातील माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी प्रचंड असल्याने पाण्याचा उपसा केल्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर पालिका कर्मचारी प्रसाद शर्मा तेथे पोहोचल्यावर त्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना संपूर्ण माहिती दिल्यावर पालिकेचा पंप तेथे आणण्यात आला. पहाटे साडेतीनपर्यंत पाणी उपसा करण्याचे काम सुरू होते.

पाटील ॲग्रो एजन्सीचे मोठे नुकसान

पाटील ॲग्रो एजन्सीचे मोठे नुकसान झाले असून, सिझन सुरू झाल्याने दुकानात असलेला मोठा खत व बियाण्यांचा साठा जलमय होऊन सुमारे सहा ते सात लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच न्यू योगेश्वर इलेक्ट्रिकलमधील इलेक्ट्रिक साहित्य खराब होऊन मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय गणेश मोबाईल, अक्षरा प्लायवूड, हिंगलाज कांस्य थाळी आदी व्यावसायिकांच्या दुकानातही पाणी शिरल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.

Wall collapsed due to accumulation of rain water.
Jalgaon Monsoon Rain : दहा-पंधरा मिनिटांच्या धुवॉंधार पावसाने ‘जल’गाव; चोहीकडे पाणीच पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.