Jalgaon Water Crisis : अनेर नदीपात्र कोरडेठाक! पाणीपुरवठा योजनांनी टाकल्या माना

Water Crisis : भर उन्हाळ्यातही गारवा देणारी जीवनदायिनी काळाच्या ओघात उन्हाळ्यात कोरडी पडू लागली असून, पात्रातील दगडगोटे तापून आग ओकू लागले आहेत
Vast basin of Aner River with ponds sustaining the river's existence.
Vast basin of Aner River with ponds sustaining the river's existence.esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : अनेर नदी... सातपुड्यातून वाहत येऊन सूर्यकन्या तापीला मिळणारी एक उपनदी. कधीकाळी मळ्यांचं हिरवं लेणं अंगावर घेऊन भर उन्हाळ्यातही गारवा देणारी जीवनदायिनी काळाच्या ओघात उन्हाळ्यात कोरडी पडू लागली असून, पात्रातील दगडगोटे तापून आग ओकू लागले आहेत. (Jalgaon Water Crisis aner river basin dried marathi news)

खान्देशात अनेर नदीचे मासे जसे पूर्वापार प्रसिद्ध आहेत तसे या नदीतील दगडगोटेही प्रसिद्ध आहेत. आजही गोल गोटे आणि अंघोळीचा फेना पात्रातून गोळा करून राज्यासह गुजरातेत गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. साधारण १९७३ ते १९७८ च्या दरम्यान अनेर नदीवर गणपूर गावाजवळ धरण झाले. त्यानंतर शिरपूर आणि चोपडा तालुक्यात डावा आणि उजवा कालवा होऊन शेतीला पाणी मिळू लागले.

बरीच वर्षे हे पाणी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी मिळत असे. मात्र, पुढेपुढे ते रब्बीसाठीच मिळू लागले आणि धुळ्यासह अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीसाठा राखीव झाला. पर्जन्यमान कमी झाले आणि नदी फेब्रुवारी, मार्चमध्येच लुप्त होऊ लागली. तिची धार आता जेमतेम दोन किलोमीटर टिकून पुढे सर्व दगडगोट्यांचे साम्राज्य दिसू लागले.

उन्हाळी हंगाम बंदच

साधारण १९८० ते १९९५ पर्यंत अनेर धरणाच्या कक्षेतील शिवारात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकत असे आणि जळगाव, धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त उन्हाळी भुईमूग पीक घेणारा हा पट्टा होता. मात्र, पाणीपुरवठा बंद झाल्याने रब्बीतील पिकेच फक्त पिकू लागली आणि भुईमुग इतिहासजमा झाला. कोट्यवधींचे उत्पादन आणि लाखोंची मजुरी बंदच झाली.  (latest marathi news)

Vast basin of Aner River with ponds sustaining the river's existence.
Nashik Water Crisis : नांदगावी जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा! वाढत्या उन्हामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा वाढतोय

पाणीपुरवठा योजनांना ताण

मार्चपासून नदी कोरडी होऊ लागल्याने चोपडा व शिरपूर तालुक्याच्या काही पाणीपुरवठा योजनांना त्यामुळे अडचण येऊ लागली. एप्रिल ते जूनदरम्यान नदीकाठावरील विहिरी, कूपनलिका कोरड्या होऊ लागल्या. गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावू लागला. गेली अनेक वर्षे उन्हे तापू लागली की हा प्रश्‍न ऐरणीवर येतो.

नदीपात्रात पाणी सोडण्याची गरज

सद्यस्थितीत गणपूरपर्यंत नदीची बारीक धार टिकते. मात्र, पुढे भवाळे, गलंगी, घोडगाव, वेळोदे, होळनांथे, भावेर आदी भागात नदीत पाणीच नसल्याने प्रश्‍न निर्माण होतो. त्यासाठी नदीपात्रात धरणातून पाणी सोडण्याची गरज सध्या आहे.

Vast basin of Aner River with ponds sustaining the river's existence.
Water Crisis: प्यायला पुरेसं पाणी नसताना लोक धुवत होते गाड्या; २२ नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.