Jalgaon Water Crisis: पारोळा तालुक्यातील लघुप्रकल्प कोरडेठाक! सर्वत्र तीव्र टंचाई; ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी भटकंती

Jalgaon News : तालुक्यातील बोरी धरण, म्हसवे लघुप्रकल्प व भोकरबारी मध्यम प्रकल्प सोडला, तर तालुक्यातील लघुप्रकल्प पाण्यावाचून कोरडेठाक असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
A small project that has run dry
A small project that has run dryesakal
Updated on

पारोळा : संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत आहे. जिल्ह्यातदेखील अशीच परिस्थिती आहे. पारोळा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर व बिकट झालेला आहे. तालुक्यातील बोरी धरण, म्हसवे लघुप्रकल्प व भोकरबारी मध्यम प्रकल्प सोडला, तर तालुक्यातील लघुप्रकल्प पाण्यावाचून कोरडेठाक असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. (Jalgaon Water Crisis Small project in Parola taluka dry)

तालुक्यात तामसवाडी व भोकरबारी असे दोन मध्यम प्रकल्प तर पिंपळकोठा, म्हसवे, शिरसमणी, बोळे, सावखेडा व निसर्डी (आर्डी) अशी लघुपाटबंधारे आहेत. आजच्या स्थितीत तामसवाडी, भोकरबारी व म्हसवे लघुप्रकल्प यात पाणीसाठा आहे. मात्र, इतर लघुप्रकल्पांत पाणी नसल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नासह दूभत्या जनावरांची चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, तामसवाडी धरणातून तामसवाडी, बोळे, शेवगे प्र अ, टोळी, पिंप्री, मुंदाणे, हिवरखेडा ही गावे आहेत, तर ढोली, पारोळा करमाड खुर्द, करमाड बुद्रुक वेल्हाणे या गावांचा पाणीपुरवठा योजना या मध्यम प्रकल्पातून सुरू आहे. दरम्यान, बोळे प्रकल्पातून कराडी गावाला पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, सध्यास्थितीत हा लघुप्रकल्प पाण्यावाचून आहे. सावखेडा, पिंपळकोठा येथील इंदासी लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत. तालुक्यातील शेतकरी यंदा वेळेवर पाऊस येईल, या आशेने आहेत. त्यामुळे मॉन्सूनपूर्व कामाला शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. (latest marathi news)

A small project that has run dry
Nashik Water Crisis : अघोषित पाणीकपातीमुळे नाशिककर वेठीस; शहरात दिवसभर पाणीपुरवठा बंद

दुभत्या जनावरांची चिंता

पारोळा तालुक्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात दूभत्या जनावरांना वेळेवर चारापाणी मिळत नाहिये. त्यामुळे दुधाचे प्रमाण कमी होण्याची भीती असल्याने दुभत्या जनांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातून किंवा इतर तालुक्यांतून महागड्या दराने चारा खरेदी करून जनावरांचे पालनपोषण करावे लागत आहे. गावात पाण्याची सोय नसल्याने शेतात किंवा पानवट्याच्या ठिकाणी जनावरांची सोय शेतकरी करीत आहेत.

पाणीसाठा -

बोरी मध्यम प्रकल्प-

२६२.६९ M

जिवंत पाणीसाठा- ०.०० द.लघमी/ ० टक्के

एकूण शिल्लक पाणीसाठा (मृत साठा) १३.९३ द.लघ.मी.

A small project that has run dry
Pune Water Crisis : पुणेकरांचा घसा काेरडा टँकर लॉबीकडे पैशाचा पूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.