Jalgaon Water Scarcity : मनमाडला 2 वॅगनद्वारे भुसावळहून पाणी! पाणीटंचाईवर पर्याय; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

Jalgaon News : यासाठी रेल्वे रुळाच्या बाजूला विशेष जलवाहिनी करण्यात आली. या चाचणीबाबत रेल्वे प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
These two wagons brought water from Bhusawal.
These two wagons brought water from Bhusawal.esakal
Updated on

मनमाड : शहराची पाणीटंचाई ही राज्यातच नव्हे, तर देशभरात परिचित आहे. त्यातच मनमाड शहर हे मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक असून, येथून रोज प्रवासी गाड्यांची जा-ये असते. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी दोन वॅगनद्वारे प्रायोगिक तत्त्वावर हे पाणी भुसावळ येथून आणण्यात आले.

प्रवाशांना पाणीटंचाई जाणवू नये, याची गुरुवारी (ता. २७) प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. यासाठी रेल्वे रुळाच्या बाजूला विशेष जलवाहिनी करण्यात आली. या चाचणीबाबत रेल्वे प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. (Jalgaon Water from Bhusawal through 2 wagons to Manmad)

These two wagons brought water from Bhusawal.
Water scarcity in Delhi : दिल्लीतील पाणीटंचाईवर आता जलसत्याग्रह

उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकाची ओळख आहे. मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकातून दररोज ११५ हून अधिक गाड्या अवागमन करतात. यामुळे स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या पाणीटंचाईचा सामना प्रवासी रेल्वेगाड्यांना आणि स्थानकातील प्रवाशांना करावा लागतो.

मनमाड शहराची पाणीटंचाई राज्यभराला माहीत आहे. या अनुषंगाने भविष्यात मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर त्याच्या झळा बसू नयेत, प्रवाशांना पाणीटंचाई जाणवू नये आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मनमाड जंक्शन स्थानकात विशेष जलवाहिनी करण्यात आली आहे. भुसावळ येथून प्रायोगिक तत्त्वावर खास रेल्वेगाडीने दोन वॅगनमध्ये एक लाख ४० लिटर पाणी आणून चाचणी करण्यात आली. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

These two wagons brought water from Bhusawal.
Nashik Water Scarcity : सटाण्यातील पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर; पुनंदच्या चारीचे काम सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com