Jalgaon News: ‘गिरणा’तून ‘मन्याड’मध्ये कावडने पाणी! जोड कालव्याच्या मागणीसाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन

Jalgaon News : गिरणा ते मन्याड जोड कालव्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून २२ खेड्यांतील शेतकरी लोकशाही मार्गाने शासनाकडे मागणी करीत आहेत.
Farmers carrying water on their shoulders to pour it into Manyad Dam.
Farmers carrying water on their shoulders to pour it into Manyad Dam.esakal
Updated on

चाळीसगाव : गिरणा ते मन्याड जोड कालव्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून २२ खेड्यांतील शेतकरी लोकशाही मार्गाने शासनाकडे मागणी करीत आहेत. मात्र, हाती आश्वासनांशिवाय काहीच लागत नसल्याने आज गिरणा धरणापासून कावड यात्रा काढून ‘गिरणा’चे पाणी मन्याड धरणात प्रतीकात्मकरीत्या आणून केलेला निर्धार पूर्ण केला. या अभिनव आंदोलनामुळे गिरणा- मन्याड जोड कालव्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Jalgaon Girnar Manmad dam kawad dam Agitation of farmers in benefit area for demand of Road canal marathi news)

मन्याड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना धरण असूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळेच गिरणा धरणातून मन्याड धरणात कालव्याद्वारे पाणी आणावे, अशी या भागातील जवळपास २२ खेड्यांमधील शेतकऱ्यांची मागणी आहे.

या संदर्भात वारंवार मागणी करूनही शासनस्तरावर कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे या मागणीकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी ही कावड यात्रा काढली. मध्यंतरी आमदार मंगेश चव्हाण यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये गिरणा- मन्याड जोड कालव्याच्या सर्वेक्षणाची मंजुरी मिळवून आणली होती.

तालुक्यात त्यातल्या त्यात मन्याड परिसरात असलेल्या दुष्काळाच्या भीषण पार्श्वभूमीवर तरी हा प्रकल्प लवकरात लवकर साकारला जाईल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु गिरणा- मन्याड जोड प्रकल्पाचा सर्वे अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे ही आशा सुद्धा फोलच ठरल्याचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खाद्यांवरुन आणले पाणी

सद्यःस्थितीत समोर भीषण दुष्काळ ‘आ’ वासून उभा असताना व पुढील अंधकारमय भविष्य डोळ्यांसमोर ठेवून लहान मुलांसोबतच ज्येष्ठांनी तरूणांच्या सोबतीने आज उन्हातान्हाची पर्वा न करता कावड पदयात्रा काढली. गिरणा धरणाच्या जलाशयातून कळशी भरून कावड खांद्यावर घेऊन कळशीतील पाणी प्रतीकात्मकरीत्या मन्याड धरणात आणून टाकले. (Latest Marathi News)

Farmers carrying water on their shoulders to pour it into Manyad Dam.
Khandesh Natya Mahotsav: खानदेश नाट्य महोत्सवात विनामूल्य दर्जेदार नाटकांची मेजवानी : अनिल कोष्टी

या अभिनव आंदोलनाची निद्रिस्त शासन व प्रशासनाने दखल घ्यावी, अशी आर्त मागणी कावडयात्रेतील शेतकऱ्यांनी केली. कावड यात्रेत विवेक रणदिवे, नवल पाटील, सुभाष पाटील, पुंजाराम पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक पवार, गणेश पवार, शुभम पवार, तात्यासाहेब पाटील, विवेक बोरसे, गोरख पारधी, रवींद्र पाटील, शिवदास पाटील, दत्तू पाटील, बाबूराव पाटील, बाळासाहेब पाटील,

निंबा चौधरी, दिलीप पाटील, भानुदास पाटील, तोताराम पाटील, शांताराम पाटील, भाऊसाहेब पाटील, संजय पाटील, योगेश रणदिवे, योगेश पाटील, देवलाल पाटील, नवल सूर्यवंशी, गणेश रणदिवे, छबिलाल पाटील, प्रशांत रणदिवे, प्रवीण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पवार, भाऊ सूर्यवंशी, दादा सूर्यवंशी, जयवंत सूर्यवंशी, दिलीप पाटील, मोहित पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील, मयूर पाटील, एकनाथ पाटील, बापू पाटील, महेंद्र शिरसाट, विजय पाटील, पद्माकर रणदिवे, श्यामराव सूर्यवंशी, हर्षल पाटील, आयुष रणदिवे व शेतकरी सहभागी झाले होते.

आमदार मंगेश चव्हाणांकडून अपेक्षा

सततच्या अवर्षणप्रवण क्षेत्राला बाहेर काढण्याचे कार्य आमदार मंगेश चव्हाण हेच करू शकतात, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. शेतकरीपुत्र असलेल्या आमदार चव्हाण यांना शेतीसाठी पाणी नसले की शेतकरी कुटुंबाची काय अवस्था होते, याची चांगली जाणीव आहे.

त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या विषयावर चर्चा होऊन काही तरी मार्ग काढावा, अशी अपेक्षा कावड यात्रेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Farmers carrying water on their shoulders to pour it into Manyad Dam.
Jalgaon News : चाळीसगाव की भडगाव? RTO कार्यालयाबाबत संभ्रम कायम; आमदार चव्हाणांच्या प्रयत्नांना यश मिळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.