जळगाव : खानदेशात रब्बी हंगाम पुढील महिन्यात सुरू होईल. हंगामात यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. गिरणा धरणातून मागील हंगामात रब्बीला पाणीच मिळाले नव्हते. कारण दुष्काळी स्थितीमुळे हे धरण मागील वेळेस फक्त ५६ टक्के भरले होते. यंदा हे धरण ९६.०८ टक्के भरले आहे. यामुळे गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरला या धरणातून पाणी मिळेल. तसेच जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर, धुळ्यात अनेर, पांझरा या प्रकल्पांतूनही रब्बीस पाणी मिळेल.