Jalgaon Cloud Burst : अमळनेर तालुक्यातील शेतांमध्ये पाणीच पाणी; 3 मंडलात ढगफुटीसदृश्‍य पाऊस

Cloud Burst : तालुक्यातील तीन महसूल मंडलात सोमवारी (ता. १७) झालेल्या पावसामुळे शेकडो एकर शेती पाण्यात गेली आहे.
While inspecting the accumulated water in the field, Dr. Anil Shinde, Suresh Patil, Prof. Subhash Patil. Damaged farmers in the neighborhood.
While inspecting the accumulated water in the field, Dr. Anil Shinde, Suresh Patil, Prof. Subhash Patil. Damaged farmers in the neighborhood.esakal
Updated on

Jalgaon Cloud Burst : तालुक्यातील तीन महसूल मंडलात सोमवारी (ता. १७) झालेल्या पावसामुळे शेकडो एकर शेती पाण्यात गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिरूड मंडलात ८१ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र, लोंढवे, निसर्डी, वाघोदे, खडके, जानवे शिवारात ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाला. पातोंडा शिवारात ६८ मिलिमीटर, मारवड मंडलात ६७, अमळनेरला ३९, नगावला ४५, अमळगावला ३०, भरवसला ११, वावडे येथे १०, असा सरासरी ४३.८८ मिलिमीटर पाऊस झाला. ( Water in fields in Amalner taluka 3 Cloudburst like rain in Mandala )

आतापर्यंत ८३.२७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. निसर्डी येथे भरत पाटील, गुलाब पाटील, चुनीलाल पाटील, राजू पाटील, महादू पाटील यांच्या शेतातून दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रवाहात पाणी वाहत होते. शेताचा तलाव झाला होता. राजेंद्र फुला पाटील (जानवे), शिवाजी पाटील, रवींद्र पाटील यांच्या शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने दगड वाहून आले आणि शेतातील माती व पिके वाहून गेली. माळीण नदीत झाडे अडकल्याने पाणी आजूबाजूला घुसल्याने गुरे वाहून चालली होती.

ऐनवेळी दोर कापल्याने गुरे वाचविण्यात आली. लोंढवे येथे सर्वांत जास्त नुकसान झाले असून, नाल्यामुळे गावाला वेढा पडला होता. लोटन पाटील, वाल्मिक पाटील, सुकलाल धनगर, अर्जुन धनगर, दिलीप पाटील, भिकन पाटील, आनंदा पाटील, श्रीराम पाटील, अमृत पाटील, अधिकार पाटील, प्रवीण पाटील, मधुकर पाटील, विनायक पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, धनराज पाटील, रामभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, नंदलाल पाटील, चतुर पाटील, कैलास पाटील.

भटावाई पाटील, झांबर पाटील, निलाबाई पाटील, भटू पाटील, प्रवीण पाटील, दौलत पाटील, जिजाबरव पाटील, वेडू पाटील, गुलाब खैरनार, लक्ष्मीबाई खैरनार, भीमराव पाटील, भाऊराव पाटील यांच्या शेतांमध्ये पाणी घुसून कापसाची पिके वाहून गेली, तर चार दुकानात पाणी घुसून त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (latest marathi news)

While inspecting the accumulated water in the field, Dr. Anil Shinde, Suresh Patil, Prof. Subhash Patil. Damaged farmers in the neighborhood.
Cloud Burst in Sikkim : सिक्किममध्ये ढगफुटीमुळे प्रलय! पुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता, शोध मोहिम सुरू

सबगव्हाण येथे वीज पडून भालेराव शिवराम पाटील यांची म्हैस मृत्यूमुखी पडली. डॉ. अनिल शिंदे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, प्रा. सुभाष पाटील, पंकज पाटील, बाळासाहेब पाटील, सरपंच भारती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मागणी केली.

''तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्यास सांगून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यांना सुरवात झाली आहे.''-अनिल पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य

''शेतकऱ्यांनी मेमध्ये लागवड केली आहे आणि शासनाने १५ जूनपासून पीकविमा काढण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने शेतकऱ्यांचा विमा काढला गेला नाही. तत्पूर्वीच बियाणे, शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने निकष बदल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.''-प्रा. सुभाष पाटील, शेतकरी नेते, अमळनेर

While inspecting the accumulated water in the field, Dr. Anil Shinde, Suresh Patil, Prof. Subhash Patil. Damaged farmers in the neighborhood.
Jalgaon Cloud Burst : चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.