Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात तापमानाचा पारा जोर धरू लागला आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अतिरिक्त उपसा होत असल्याने वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे जानेवारीपासून पाणीपातळीचे निरीक्षण केले जाते. यात काही भागात जलपातळीत मोठी घट झाल्याची स्थिती आहे. यंदा भुसावळ, बोदवड, यावल आणि धरणगाव तालुक्यांतील पाणीपातळीत एक मीटरपर्यंत घट झाल्याची माहिती भूजल विभागाच्या सूत्रांनी दिली.
वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे मागील पाच वर्षांची पाणीपातळीची सरासरी लक्षात घेऊन जिल्ह्यातील १५ तालुक्यांची पाणीपातळी मोजली जाते. (Jalgaon Water Scarcity Decrease in water level in 4 talukas of district)
मागील वर्षांत १३० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असले, तरी यंदा जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पाणीपातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदा सर्वाधिक परिणाम भुसावळ, बोदवड, यावल आणि धरणगाव तालुक्यांत दिसून आला आहे. या तालुक्यांमधील पाणीपातळीत एक मीटरपर्यंत घट झाल्याची माहिती भूजल विभागाच्या सूत्रांनी दिली.
जलस्तर घटण्याची कारणे
झपाट्याने होणारे शहरीकरण व त्या तुलनेत जलस्रोतांची घटलेली संख्या. दिवसागणिक घटत चाललेले पर्जन्यमान. जलस्रोतांमधील पाण्याचा सुमार उपसा. पुनर्भरणाच्या प्रक्रियेकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, ही जलस्तर घटण्याची कारणे आहेत.
पारा ३७ अंशांवर
जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा ३७ अंशांवर पोहोचला आहे. दुष्काळी स्थितीत पाणीटंचाईच्या झळा गावपाड्यांबरोबर शेतीशिवारात जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेचा फटका वृक्षांच्या रोपट्यासह वाढ अवस्थेत असलेल्या लहान वृक्षांना बसू लागला आहे. (latest marathi news)
टंचाईची तीव्रता वाढणार
महामार्गालगतच्या वृक्षांना जगविण्यासाठी संबंधित प्रशासनाने टॅंकरने पाणी घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. लहान गावांमध्ये दोन-तीन दिवसांआड, तर मोठ्या गावांमध्ये पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आणखी पंधरा दिवसांनंतर तीव्रता वाढणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीने आतापासूनच उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पशु-पक्ष्यांनाही तापमानाचा फटका
दुष्काळी स्थितीत शेतशिवारासह जंगलामधील पशू-पक्ष्यांही पाण्याचा फटका बसत आहे. हे पशू-पक्षी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे फिरकू लागले आहेत. तर दुसरीकडे राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्षांना पाणी देण्यासाठी टॅंकर सुरू झाले आहेत. पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावणे आणि जगविणे किती महत्त्वाचे आहे. पाणीटंचाई दूर करताना झाडेही जगविण्याचा प्रयत्न होत केले जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.