Jalgaon Water Shortage : भडगावातील 7 गावांमध्ये टॅंकर; पाणीप्रश्‍न गंभीर

Water Shortage : चार गावांमधील खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती येथील पंचायत समितीच्या स्थापत्य अभियंता वृषाली पाटील यांनी दिली.
Water Shortage
Water Shortageesakal
Updated on

Jalgaon Water Shortage : तालुक्यात सद्यःस्थितीत सात गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर चार गावांमधील खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती येथील पंचायत समितीच्या स्थापत्य अभियंता वृषाली पाटील यांनी दिली. यंदा कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यात टँकरने तहान भागविण्याची वेळ आली आहे. (Water Shortage Tanker in 7 villages of Bhadgaon )

सध्या वातावरणात उन्हाची तीव्रता कमी न होता वाढतच असल्याने पाणीप्रश्‍न आणखीनच गंभीर होण्याची चिन्हे दिसून येत आहे. भडगाव तालुक्याच्या मध्यभागातून निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणारी गिरणा नदी वाहते. त्यामुळे तालुक्यात एकही मोठा प्रकल्प नसताना गिरणा नदीमुळे पाणीटंचाईचे संकट सहसा घोंगावत नाही. मात्र, तालुक्याच्या टोकांवरील गावांना दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यात विशेषतः मळगाव, आंचळगाव या गावांचा समावेश आहे.

सात गावांना टॅंकर

भडगाव तालुक्यातील सात गावांमध्ये यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्यात आंचळगाव, धोत्रे, तळवण तांडा, वसंतवाडी, मळगाव, पासर्डी व वडगाव बुद्रूक या गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आंचळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांनाच चार टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरु आहे. ही गावे पारोळा तालुक्याच्या सीमेला लागून आहेत.

दरवर्षी या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मळगावची देखील अशीच परिस्थिती आहे. या दोन्ही गावांना जलजीवन मिशन अंतर्गत गिरणा नदीवरून पाणीपुरवठा योजना मंजुर असून त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे या गावांना पुढीलवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार नाही. (latest marathi news)

Water Shortage
Phulambri Water Shortage : फुलंब्री तालुका टँकरच्या विळख्यात..! 52 गावात 69 टँकर

चार विहिरी अधिग्रहीत

तालुक्यातील भोरटेक, महिंदळे, उमरखेड व पिंपरखेड चार गावांमधील खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. पाणी असलेल्या या चारही विहिरींतून चार गावांना सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. बाळद गावातही पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरवात झाली आहे. त्यामुळे या गावात अखेरच्या टप्प्यात प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहे.

आवर्तनाची गरज

गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तने आरक्षित करण्यात आली आहेत. त्यानुसार तीन आवर्तने सोडली गेली आहेत. मागील महिन्यातच तिसरे आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, उष्णतेच्या तीव्रतेमुळे गिरणा काठावरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी टप्पा घेऊ लागल्या आहेत.

पर्यायाने पाणीटंचाई जाणवत असल्याने गिरणा धरणातून तत्काळ चौथे आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. गिरणा धरणात २१ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. या आवर्तनाला साधारण दहा ते बारा टक्के पाणी लागू शकते, असे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

Water Shortage
Jalgaon Water Shortage : निंभोरा परिसरात अनियमित पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.