Jalgaon News : पावसाळा सुरू झाला तरी तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने तळवाडे येथे टँकर सुरू करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत तर ९ गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जून महिना उलटला तरी पावसाचे आगमन समाधानकारक झालेले नाही. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे.( Jalgaon Water Supply Update Even in rainy season Water shortage in some villages Jalgaon News)
नद्यांना अद्यापही पाणी आलेले नाही. परिणामी अजूनही दहा गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. तळवाडे येथे तर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. तळवाडे गावाची लोकसंख्या १२६५ इतकी तर जनावरांची संख्या ४०० इतकी आहे. ग्रामस्थ इकडून तिकडून लांब अंतरावरून पाणी आणत आहेत.
म्हणून ग्रामपंचायतीने टँकरच्या मागणीचा ठराव करून प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता.
२० लिटर प्रति याप्रमाणे ३३ हजार ३०० लिटर पाण्याची आवश्यकता होती. उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी टंचाईची खात्री करून दररोज २४ हजार लिटर क्षमतेचे तीन टँकर तळवाडे येथे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
सुमारे १७ किलोमीटर अंतरावरून अमळनेर पालिकेच्या विहिरीवरून टँकर भरून तळवाडे येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात टंचाईची समस्या मिटणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.