Wedding Season : एप्रिलमध्येच उरकले जाताहेत लग्न; मेमध्ये केवळ 2 मुहूर्त

Jalgaon News : ३ मे ते ११ जूनपर्यंत एकही विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Wedding
Weddingesakal
Updated on

Jalgaon News : लग्नसराईत यंदा विवाहासाठी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त आहेत. ३ मे ते ११ जूनपर्यंत एकह‌ी विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. एप्रिलमध्येच विवाह उरकण्याचे अनेकांनी नियोजन केले आहे. त्यामुळे सध्या लग्न समारंभ जोरात सुरू आहे. (Wedding are done in April)

मे-जूनमध्ये गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र वचन आहे. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने मेमध्ये मुहूर्त कमी आहेत. यंदा विवाह मुहूर्त कमी असल्याने व्यावसायिकांवरही परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे काही कुटुंबियांनी लग्न जुळवून ठेवले आहेत.

मात्र, मुहूर्त न काढल्याने त्यांची मोठी फजिती होत आहे, तर काही कुटुंब मुहूर्त न बघताच लग्नकार्य आटोपण्याच्या मनस्थितीत आहेत. मेमध्ये फारसे मुहूर्त नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी मुलांचे लग्न एप्रिलमध्येच आटोपून घेतली आहेत. (latest marathi news)

Wedding
Jalgaon News : ‘त्या’ पाचशेवर ॲप्रेंटिसधारकांना मिळाला न्याय! रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त

सरकारी नोकरी नसलेली मुले लग्नाच्या प्रतीक्षेत

मुलीकडच्या कुटुंबीयांचे सरकारी नोकरी असलेल्या मुलास प्राधान्य असते. अनेक मुले खासगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करीत आहेत. मात्र, त्यांना सरकारी नोकरी नसल्याने लग्नासाठी मुली मिळत नाही.

यामुळे मुलांचे वय वाढत चालले आहे. त्यातच या वर्षी मुहूर्त कमी असल्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. मुलांचे आईवडिल सध्या चिंतेत आहेत.

Wedding
Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

जुलैपर्यंत असे आहेत विवाह मुहूर्त

मे : १, २

जून : १३, १६, १८, २४, २५, २६, २८

जुलै : १९, २१, २२, २३, २६, २७, २८, ३१

Wedding
Jalgaon Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी जळगावला मुक्कामी थांबणार; नाराजांशी चर्चेसह व्यूहरचनेवर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.