Jalgaon News: पाणीपुरीच्या दर्जाबाबत करायचं तरी काय? कमळगावच्या घटनेवरून प्रश्नचिन्ह; आवश्‍यक ती काळजी घेण्याची सर्वांनाच गरज

Jalgaon News : तशी ही बाब अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणारी. परंतु किती पाणी ठेलेवाल्यांच्या पाणीपुरी व तत्सम पदार्थांचे नमुने घेतले जातात, हा एक संशोधनाचा विषय आहे.
panipuri eating
panipuri eatingesakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : कमळगाव (ता. चोपडा) येथील आठवडे बाजारात पाणीपुरी खाऊन विषबाधा झालेल्या ८० जणांची पहिल्या दिवशी तब्बेत बिघडली. दुसऱ्या दिवशी ही संख्या ११०वर पोहोचली. कमळगाव, चांदसनी, पिंप्री आदी परिसरातील ग्रामस्थ यात आहेत.

आरोग्ययंत्रणेसह परिसरातील गावकरी व तालुक्यातील, पदाधिकारी, अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धाव घेत प्रसंग नीस्तारण्यासाठी कार्यवाही करावी लागली. अजूनही त्यातील बरेचजण दवाखान्यातच आहेत. म्हणून आता याला कारणीभूत ठरलेल्या पाणीपुरीच्या दर्जाबाबत करायचं तरी काय? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (Jalgaon Pani Puri Kamalgaon poisoning incident)

महाराष्ट्रासोबत परप्रांतातील कारागीर, व्यावसायिक आपल्या भागात येऊन शहरासह खेड्यांत पाणीपुरी तयार करून विक्री करतात. हा व्यवसाय अखंडपणे सुरू असतो. युवक, युवतींसाठी तर शहरी भागात पाणीपुरी हा रोजचाच विषय. मग वन ट्वेंटीवरून राज्य देण्याचा विषय असो वा कॉन्ट्रीब्युशनचा विषय असो, रोज हजारो नव्हे लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या शहरात पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचणारे लाखोंच्या संख्येने आहेत.

आदल्या दिवशी तयार केलेल्या पाणीपुऱ्या व त्यात टाकण्यात येणारा पुदिना, संचळखारमिश्रित पाणी, शिजवलेल्या बटाट्याची पेस्ट एवढ्यावर चालणारा हा व्यवसाय अनेक ठेलागाड्यांना हजारोंचा व्यवसाय मिळवून देतो. पाणीपुरीची चटक जशी विद्यार्थी-विद्यार्थिनींना तशीच नोकरवर्गालाही आहे. अलीकडे आठवडे बाजारातून ठेल्यावर पोहोचणारे अनेकजण आहेत.

भले ही पाणीपुरी तळलेली बारीक कुरकुरीत वाटत असेल परंतु, तिच्यात वेगवेगळे पदार्थ टाकून तयार करण्यात येणारे पाणी प्रत्येक पाणीपुरीच्या वेळेला पाणीपुरीचा ठेलेवाला त्यात हात बुडवून पाणी पुऱ्यांमध्ये टाकतो, पाणीपुरी व बटाटे शिजवून तयार करण्यापासून ती रात्री व्यवस्थित ठेवण्यापासून बाजारात येईपर्यंत व ग्राहकांच्या तोंडात जाईपर्यंत घडणारा घटनाक्रम सुरळीतपणे चालला तरच हे उपयोगाचे, अन्यथा घडलेला हा प्रसंग अनेकांच्या जीवाशी खेळ करणारा ठरू लागला आहे. तशी ही बाब अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणारी. परंतु किती पाणी ठेलेवाल्यांच्या पाणीपुरी व तत्सम पदार्थांचे नमुने घेतले जातात, हा एक संशोधनाचा विषय आहे. (latest marathi news)

panipuri eating
Arvind Kejriwal: एक लाखाचा वैयक्तिक जातमुचलका, साक्षीदारांशी संपर्क...; केजरीवालांना या अटींवर जामीन, आज होणार सुटका

]ग्राहकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ!

पाणीपुरी ग्राहकांच्या आवडीचा खाद्यपदार्थांचा आहे. तरीदेखील प्रत्येक खाद्यपदार्थासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. या घटनेच्या नमुन्यांमधून पाणी किंवा खाद्यपदार्थ, झालेला बिघाड या घटनेशी कारणीभूत घडू शकतो. नमुन्यांतून ते समोर येईल तशी कार्यवाही होईल.

परंतु, ज्या गोष्टीचा जीवाशी संदर्भ येतो, त्या खाद्यपदार्थाबाबत सर्वच घटकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. कमळगावच्या घटनेने हा प्रश्न विविध माध्यमातून चर्चिला गेल्याने तो राज्यभर पसरला. किमान यापुढे तरी या गोष्टींची खबरदारी घेतली जाईल. सर्वच प्रकारच्या यंत्रणा, ग्राहक व विक्रेते या गोष्टींकडे लक्ष पुरवतील, अशी आशा धरायला काही हरकत नाही!

panipuri eating
Jalgaon News: प्रताप महाविद्यालयातील 26 जणांची मान्यता अखेर रद्द! अमळनेरला पत्रकार परिषदेत लोटन चौधरी; दिलीप जैन यांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.