Jalgaon Loksabha : खासदारांची उमेदवारी कापण्याचा इतिहास घडणार की वर्तमान राहणार! जिल्ह्यात उत्सुकता

jalgaon : जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हटला जात आहे. गेल्या चार ते पाच पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचेच जळगाव व रावेर मतदार संघातून खासदार निवडून आलेले आहेत.
Ksha Khadse, Unmesh Patil, Rohit Nikam, Smita Wagh Girish Mahajan, Dr.Ketaki Patil
Ksha Khadse, Unmesh Patil, Rohit Nikam, Smita Wagh Girish Mahajan, Dr.Ketaki Patilesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हटला जात आहे. गेल्या चार ते पाच पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचेच जळगाव व रावेर मतदार संघातून खासदार निवडून आलेले आहेत. पक्षाने दोन्ही खासदारांची उमेदवार आजपर्यंत कधीही कापलेली नाही. कधी रावेरचा उमेदवार बदलला आहे, तर कधी जळगाव लोकसभेचा बदलला आहे. मात्र यावेळी दोन्ही मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या चर्चा सुरू आहेत. (Jalgaon Will history of cutting candidature of MPs happen or will it remain present marathi news)

असे झाल्यास पक्षाचा हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे. परंतु दोन्ही खासदाराची उमेदवारी कायम राहिल्यास नव्याने वर्तमान घडणार आहे. जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा गड होता, या ठिकाणी कॉंग्रेसने कोणीही उमेदवार दिला तरी तो निवडून दिला जात होता. अगदी १९५७ मध्ये मुंबई येथील तत्कालीन नेते नौशेर भरूचा यांना कॉंग्रेसने जळगाव लोकसभेत उमेदवारी दिली होती. त्यांनाही या ठिकाणच्या जनतेने निवडून दिले होते.

मात्र कालांतरांने जळगाव जिल्ह्यात भाजपने आपली पाळेमुळे जमविली आहेत. अगदी ग्रामीण भागापर्यंत हा पक्ष पोहोचला आहे. जळगाव व रावेर हे दोन्ही लोकसभा मतदार संघ भाजपने गेल्या पाच पंचवार्षिकपासून हिसकावून घेतले आहेत. अनेकवेळा प्रयत्न करूनही कॉंग्रेसला दोन्ही मतदारसंघ राखता आलेले नाहीत.

पैसे घेवून संसदेत प्रश्‍न विचारण्याच्या आरोपात काही खासदार निलंबित झाले होते, त्यात भाजपचेही जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार होते. दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी तत्कालीन एरंडोल लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वंसतराव मोरे यांनी बाजी मारली होती.

Ksha Khadse, Unmesh Patil, Rohit Nikam, Smita Wagh Girish Mahajan, Dr.Ketaki Patil
Jalgaon News : हुकूमशहा मोदीविरोधात ताकदीने सामना करा : उध्दव ठाकरे

हाच एक भाजपचा पराभव झाला होता. मात्र, पुन्हा झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपने ही जागा पुन्हा आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळविले. पोटनिवडणूकीत जळगाव लोकसभा मतदार संघात मात्र भाजपने पुन्हा विजय मिळविला होता. हा लोकसभा मतदार संघ त्यावेळी आघाडीत कॉंग्रेसकडेच होता मात्र तरीही यश मिळाले नाही.

कालांतराने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांची पुनर्रचना झाली. पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ हा जळगाव लोकसभा झाला, तर जळगाव हा आताचा रावेर लोकसभा मतदारसंघ झाला आहे. मात्र या बदलातही भाजपने दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात आजपर्यंत यश मिळविले आहे.

दोन्ही खासदार बदलाची चर्चा

जळगाव लोकसभा मतदार संघात उन्मेश पाटील, तर रावेर लोकसभा मतदार संघात श्रीमती रक्षा खडसे खासदार आहेत. पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांची ही दुसरी टर्म असणार आहे. तर रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांची तिसरी टर्म असेल. मात्र, यावेळी दोन्ही मतदार संघातील खासदारांची उमेदवारी पक्षातर्फे कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास हा इतिहास घडणार आहे. (latest marathi news)

Ksha Khadse, Unmesh Patil, Rohit Nikam, Smita Wagh Girish Mahajan, Dr.Ketaki Patil
Jalgaon News : दिवस उजाडताच 2 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी; फर्निचर दुकानासह वाशिंग सेंटर जळून खाक

कारण पक्षाने आजपर्यंत दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारी कापलेल्या नाहीत. २०१४ मध्ये तेव्हाचे खासदार हरिभाऊ जावळेंची उमेदवारी कापण्यात आली होती. मात्र, त्यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातून ए.टी.पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. तर २०१९ मध्ये खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली होती.

मात्र. रावेरमधून रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळे भाजप आता काय करणार; याकडे लक्ष असणार आहे. दोन्ही खासदारांच्या उमेदवारी रद्द करून इतिहास घडविणार की दोन्ही खासदारांच्या उमेदवारी कायम ठेवून वर्तमान चालू ठेवणार आहे. तसेच एका खासदाराची उमेदवारी कापून दुसऱ्या खासदाराला आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे उमेदवार कायम ठेवणार आहे. याकडेच आता खऱ्या अर्थाने लक्ष आहे.

जळगावातून निकम की, वाघ?

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी बदलाचाच विचार केला तर राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांचे पुतणे व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले जिल्हा दूध संघाचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांचे नाव चर्चेत आहे. माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करूनही ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.

रावेरमधून डॉ. केतकी की, मंत्री महाजन

रावेर लोकसभा मतदारसंघातही उमेदवारी बदलाचा पक्षाने निर्णय घेतल्यास पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ.केतकी महाजन यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पक्षातर्फे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरू आहे. महाजन यांना उमेदवारी मिळाल्यास पक्षातर्फे राज्यातील मंत्री निवडणूक लढण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असणार आहे.

Ksha Khadse, Unmesh Patil, Rohit Nikam, Smita Wagh Girish Mahajan, Dr.Ketaki Patil
Jalgaon News : संस्कारांचं पावित्र्य, शाही सोहळ्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न : लिना पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com