Jalgaon District Jail : जळगाव कारागृहाची सुरक्षा वाढवणार!

Jalgaon News : जळगाव जिल्‍हा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदिवान असून यापूर्वी जुलै २०२३ मध्ये भुसावळ येथे उपकारागृहासाठी प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.
 Jalgaon District jail
Jalgaon District jailesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्‍हा उपकारागृहात बाहेरून आलेल्या चाकूने बंदिवानाची हत्या झाल्याचे समोर आले असून हे प्रकरण गांभीर्याने हाताळत जळगाव कारागृहाची बाहेरील आणि आतील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली. (increase security of District jail)

जळगाव जिल्‍हा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदिवान असून यापूर्वी जुलै २०२३ मध्ये भुसावळ येथे उपकारागृहासाठी प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. त्या अंतर्गत वीस एकर जागाही अधिगृहीत करण्यात आलेली आहे. आज त्या जागेची पाहणी देखील विशेष महानिरीक्षक डॉ. सुपेकर यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्‍हा कारागृहाच्या भिंती गेल्या वर्षीच वाढवण्यात आल्या असून बाहेरून शस्त्र आणि साहित्य फेकले जात असल्याने बाहेरील गस्त वाढविण्यात येणार आहे. (latest marathi news)

 Jalgaon District jail
Jalgaon News : ज्वारी खरेदी सुरू करावी, दूधाला दर मिळावा; महाविकास आघाडीचे धरणे सुरू, ‘शंभर खोके..एकदम ओके’चा नारा’

तसेच जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना या बाबत पत्र देण्यात येऊन कारागृह परिसरात संबंधित पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचीही गस्त राहील. जिल्‍हा कारागृहात २३६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहे.

कारागृहे आता सुधारगृहे

राज्यातील कारागृहे आता सुधार गृहात रुपांतरीत झाली आहेत. बंदिवांनाना सुधारण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न सुरु आहेत. बंदिवानांच्या पुनर्वसनासाठी वैद्यकीय शिबिरे, आरोग्य तपासण्या नियमीत केल्या जातात. प्रत्येक बंदिवानांचे आम्ही आयुष्यमान कार्ड तयार करवून घेतलेले असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.

 Jalgaon District jail
Jalgaon News : धरणगावात 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटी मंजूर! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.