जळगाव : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता. १०) कमाल तापमानात चार अंशाने वाढ झाल्याने तापमान नऊ अंशांवर पोचले. दरम्यान, येत्या १५ जानेवारीपर्यंत तापमान ९ ते ११ अंशांदरम्यानच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सोमवारी (ता. ९)पासून तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्यापासून सरंक्षण करण्यासाठी नागरिकांनी काम असेल तर घराबाहेर पडा, गरम कपडे वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Jalgaon Winter Update Nine degree temperature in district including city Cold wave till 15th January Jalgaon News)
थंडीच्या लाटेला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संरक्षणाचे उपाय सुचविले आहेत. नागरिकांनी थंडीच्या लाटेपासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.
थंडीत स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास किंवा हाताची बोटे, कानाची पाळी, नाकाचा शेंडा यांचा रंग पांढरा किंवा फिक्कट झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, शरीर थंड पडणे, थंडी वाजणे, स्मृतिभ्रंश होणे, बोलताना विसंगती किंवा अडखळणे, उच्चार स्पष्ट न करता येणे, अंधारी येणे, थकवा जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.
...अशी घ्या काळजी
- अतिशय आवश्यकता असल्यास घराबाहेर जा, अन्यथा घरीच थांबा
- उबदार कपडे आहेत याची खात्री
- एकटे राहणाऱ्या वयोवृद्धांकडे शेजारच्या व्यक्तींनी लक्ष द्यावे
- गरम राहणाऱ्या, जास्त हवा न येणाऱ्या खोलीत राहा
- शक्य झाल्यास रूम हिटरचा वापर करा
- गरम पेय घ्यावे
- मफलरचा वापर करावा
- ताजे पदार्थ खावेत, त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल
- मादक पदार्थ, अल्कोहोलमिश्रित नसलेले पेय घ्या
- हिमबाधा झाल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे
आपत्कालीन परिस्थितीत खालील नियंत्रण कक्षास संपर्क करावा.
नियंत्रण कक्ष : टोल फ्री १०७७, ०२५७-२२१७१९३/२२२३१८०
जिल्हा पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष : टोल फ्री १००, ०२५७-२२२३३३३/२२३५२३२
महापालिका नियंत्रण कक्ष : १०१ व १०२, २५७-२२३७६६६/२२२४४४४
जिल्हा सामान्य रुग्णालय, रुग्णवाहिका : टोल फ्री १०८, ०२५७-२२२६६११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.