ladki Bahin yojana : पंधराशे रुपयांसाठी महिलांची धावाधाव! पारोळा येथील तहसीलसह बँका, सेतूसुविधा केंद्रांत गर्दी

Jalgaon News : या योजनेच्या लाभासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमाव करण्यासाठी शहरातील महिलांनी आज सोमवारी (ता. एक) एकच गर्दी केली होती.
Women rush to the bank to do KYC.
Women rush to the bank to do KYC.esakal
Updated on

पारोळा : राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या सचिवांनी अध्यादेशही जारी केला. म्हणून या योजनेच्या लाभासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमाव करण्यासाठी शहरातील महिलांनी आज सोमवारी (ता. एक) एकच गर्दी केली होती. (Jalgaon Women crowded for ladki Bahin yojana fifteen hundred rupees)

यावेळी जुने तहसील कार्यालय परिसरासह बँक व सेतूसुविधा केंद्रांत महिलांची एकच गर्दी झालेली दिसली. हातावर पोट असणाऱ्या महिलांची आज शेतीला दांडी मारीत कागदपत्रांची जमवाजमव करताना धावपळ झाली. तालुक्यात समाधानकारक पाऊस नुकताच झाला.

त्यातच शेतीमशागतीच्या कामांनी वेग घेतला होता. मात्र, राज्य सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली. त्यामुळे अनेक महिलांनी शेतीच्या कामांकडे पाठ फिरवीत लाभासाठी दिवसभर कागदपत्रे जमविण्यास सुरुवात केली. अनेक महिलांचे बँक खाते गोठवले गेले आहेत. (latest marathi news)

Women rush to the bank to do KYC.
Maharashtra Cabinet Expansion: पावसाळी अधिवेशनानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; कोणाला मिळणार मंत्रीपदांची संधी?

बऱ्याच महिलांची ईकेवायसी झाली नाही. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कामधंदे सोडून करावी लागणारी धावपळ जिकरीची होणार आहे. त्यातच अनेक महिला अशिक्षित आहेत. या योजनेत लागणाऱ्या कागदपत्रांसाठी अनेक दलालांचा हस्तक्षेप डोकेदुखी ठरणार आहे.

Women rush to the bank to do KYC.
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डवर कोण चालवतंय सिमकार्ड? आता घरबसल्या एका कॉलवर कळणार,असे बंद करा फेक सिम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.