Jalgaon News : जळगाव ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील वाकोदजवळील वाघूर नदीच्या पुलावरील पूल जीर्ण झाल्यामुळे पुढील दुरुस्तीसाठी वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १५ जूनला काढली होती. त्यातील आदेशानुसार १६ जूनपासून हा पूल रहदारीसाठी बंद करण्याचे आदेश होते. परंतु दोन दिवस सुट्टी आल्याने या पत्रावर प्रत्यक्ष कार्यवाही मंगळवारपासून (ता. १८) झाल्याचे दिसून आले. ()
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठिकठिकाणी रस्ता बदलचे फलक लावून वाहतूक वाळविण्यात आली. परंतु यात वाहनधारकांचे प्रचंड हाल होताना दिसले. दुपारी पूल बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने खोळंबली होती. यावेळी या महामार्ग बांधकाम ज्यांनी घेतलेले आहे, त्यांचे प्रकल्प प्रमुख श्रीनिवास सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेरचे अभियंता संदीप पाटील यांनी यावेळी या पुलाची पाहणी करून २० दिवसांच्या आत हा पूल पूर्ववत सुरू करू, असे आश्वासन श्रीनिवास यांनी यावेळी दिले. (latest marathi news)
त्याचबरोबर जमीन अधिग्रहणाचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी निकाली काढून नवीन पुलाचे अपूर्ण राहिलेले काम तत्काळ पूर्ण करता येईल, असे मत श्रीनिवास यांनी ‘सकाळ’शी व्यक्त केले. दरम्यान, बुधवारपासून (ता. १९) पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू होणार असून, आधी पुलाच्या खालच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी तडे गेले आहेत. त्यांना योग्य तो सॅप्पोर्ट देऊन मजबूत करून तात्पुरती व्यवस्था केली जाणार आहे. अर्थात ही व्यवस्था तात्पुरती आहे. यावर उपाय वाहतूक बंद करून जुना पूल दुरुस्त करणे हा नसून जमीन अधिग्रहणाचा वाद मिटवून नवीन पूल पूर्ण व्हावा, हिच अपेक्षा वाहनधारकांची आहे.
मंत्री महाजनांनीही घेतली माहिती
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारस कारने छत्रपती संभाजी नगरला जात असताना त्यांना देखील पुलामुळे पर्यायी रस्ता वापरावा लागला. या वेळी त्यांनी या पुलाची माहिती घेतली व या पुलासंदर्भात लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सुरेश जोशी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.