डी. बी. पाटील : सकाळ वृत्तसेवा
यावल : जिल्ह्यातील सुमारे ६० वर्षांहून अधिक जुने असलेले यावल एस. टी. आगार अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. बसस्थानकाची जीर्ण इमारत, आवारात डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यात होत असलेला चिखल, यासह स्वच्छतेचा अभाव अशा एक ना अनेक समस्या या आगारात भेडसावत आहेत.
सुमारे ३० वर्षांपूर्वी भुसावळ बसस्थानक यावल आगारात समाविष्ट होते. नंतरच्या काळात भुसावळ आगार सुरू झाले. आगाराची सुरवातीचीच इमारत सद्यस्थितीत वापरात आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे. बसस्थानक इमारत मंजूर असल्याचे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सांगितले जात आहेत. तसेच बीओटी तत्त्वावरील दुकान संकुलाचेही भिजत घोंगडे कायम आहे. (Yawal MSRTC Depot dilapidated passenger shelter)