Jalgaon News : कळमसरे येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon : सुनील मधुकर पाटील (वय ४१) यांनी जिल्हा बँकेच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Sunil Patil
Sunil Patilesakal
Updated on

Jalgaon News : येथील रहिवासी सुनील मधुकर पाटील (वय ४१) यांनी जिल्हा बँकेच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.१८) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. सुनील यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वीच आजाराने निधन झाले. आता त्यांनीही जीवन संपविल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. सुनील गावातील श्रीराम मंदिराजवळील भाड्याच्या घरात राहत होते. (young farmer from Kalamsare took an extreme step )

त्या घरालगतच असलेल्या जिल्हा बँकेच्या ओट्यावरील शौचालयात रात्रीच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन सुनीलने आत्महत्या केली. सकाळी उठल्यावर मुलांनी वडिलांना शोधायला सुरवात केली. नातेवाइकांकडेही तपास केला असता, ते मिळून आले नाहीत. दुपारपर्यंत सुनील त्यांच्या मुलांना व भावाला कुठेच दिसून आले नाहीत.

Sunil Patil
Jalgaon News : भुसावळ, चोपडा, चाळीसगावला अतिवृष्टी! रिपरिपीने जनजीवन विस्कळित

दुपारी एकच्या सुमारास जिल्हा बँकेतील कर्मचारी शौचालयात गेल्यावर सुनीलने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांच्या दोन्ही मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता. सुनील यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वीच दीर्घ आजाराने निधन झाले. शेती व मजुरी करून सुनील त्यांच्या दोन्ही मुलांना स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालीत होते. नापिकी व बचत गटाच्या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे यांनी शवविछेदन केले. याबाबत नारायण पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सुनील पाटील यांच्यावर गुरुवारी सायंकाळी साडेसहाला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आईवडिल, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

Sunil Patil
Jalgaon News : पाणीटंचाई असलेल्या 41 गावांत ‘आबादानी’! पावसामुले टँकरची संख्या घटली; 112 वरून 62 वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.