लोणी (ता. चोपडा) : जीवनात येणारा प्रत्येक जीव एक दिवस या पृथ्वीतलावरून जाणारच आहे. म्हणून मानवी जीवनाचा अखेरचा प्रवासही सुखकर व्हावा, याच उद्देशाने गावातील तरुणांनी येथील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमात गावकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. (Cleanliness campaign carried out by villagers in Amardham crematorium)
येथील अमरधाम स्मशानभूमीत वाढलेल्या झाडांवर, झुडुपांवर व गवतावर तरुणांनी तणनाशकाची फवारणी करून परिसर स्वच्छ केला. तुषार चव्हाण, शरद पाटील, चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, रावसाहेब पाटील, सुधीर पाटील, किशोर पाटील, प्रेमराज पाटील, प्रमोद पाटील, गजेंद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाठीवर फवारणीचा पंप घेऊन अमरधाम स्मशानभूमीत काटेरी झाडेझुडपे गवतावर तणनाशकाची फवारणी केली.
जेणेकरून चार पाच दिवसांत ते गवत व काटेरी झाडेझुडपे जळुन जातील व परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल. स्मशानभूमीत झाडेझुडपे वाढून परिसर खराब झालेला होता. रस्ताही काटाकुट्यांनी वेढलेला होता. ही बाब कुठेतरी खटकते म्हणून तरुणांनी स्वच्छतेचा केलेला संकल्प प्रत्यक्षात उतरवला. तरुणाईच्या या संकल्पाचे गावातील ग्रामस्थांसह परिसरातील जनतेनेही कौतुक केले. अशाच नवनवीन संकल्पना तरुणांनी राबवाव्यात, ही अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.