Accident News: हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेले अन्.. भीषण अपघातात जळगावातील शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपलं

दिवाळी सुट्टीमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षक कुटुंबियांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला आहे
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

दिवाळी सुट्टीमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षक कुटुंबियांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन्ही कुटुंबियातील प्रत्येकी ३-३ अशा ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास राजस्थानमध्ये घडली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

या भीषण अपघातात दोन्ही कुटुंबियातील प्रत्येकी ३-३ अशा ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा सोनवणे (वय ५०), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (वय ५), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७), गायत्री योगेश साळुंखे (वय ३०), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय १) मृतांची नावे आहेत.

कार कंटेनरवर धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मृत शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहे.

Accident News
Air Pollution: मुंबईपेक्षाही पुण्याची खराब स्थिती; दोन दिवसांत प्रदूषणात मोठी वाढ, पुण्याची फुप्फुसे भरली अशुद्ध हवेने

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्यानंतर धनराज नागराज सोनवणे आणि योगेश धोंडू साळुंखे या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब कारने राजस्थान फिरायला जायचे ठरले होते.

दोन्ही कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. डोरीमना गावाजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारने एका कंटेनरला धडक दिली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत शिक्षक कुटुंबीयावर काळाने घाला घातल्याने अमळनेर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Accident News
MP Election 2023: मध्यप्रदेशात ४७२ उमेदवार 'कलंकित'; भाजपच्या सुरेंद्र पटवा यांच्यावर १७५ गुन्हे दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.