Jalgaon News : चिनावल येथील परिस्थिती नियंत्रणात! पुढील 2 दिवस संचारबंदी

Jalgaon News : चिनावल येथे शुक्रवारी दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर येथील परिस्थिती पोलिस प्रशासनाकडून नियंत्रणात आणण्यात आली असून सोमवार पर्यंत याठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
situation at Chinawal Gaon is under control
situation at Chinawal Gaon is under controlesakal
Updated on

चिनावल : येथे शुक्रवारी (ता. १७) दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर येथील परिस्थिती पोलिस प्रशासनाकडून नियंत्रणात आणण्यात आली असून सोमवार (ता. २०) पर्यंत याठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.१७) रात्री आठ ते नऊ दरम्यान येथे दोन गटात जोरदार वाद झाला. यानंतर वाद चिघळल्याने रोहित्र बंद करत दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी गावात तणावाचे वातावरण झाले. (situation at Chinawal Gaon is under control)

घटनेची माहिती कळताच मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी.

फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर गावात सोमवारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (latest marathi news)

situation at Chinawal Gaon is under control
Jalgaon Summer Heat : भरउन्हाळ्यात विद्यापीठाच्या परीक्षा! अनेक विद्यार्थ्यांची दांडी

दरम्यान घटना कशामुळे घडली याचा तपास पोलिस करीत असून रात्री उशिरा सावदा पोलिस स्टेशनला याबाबत एका महिलेने तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी गावातील महिला व पुरुषांनी रस्त्यावर उतरत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

situation at Chinawal Gaon is under control
Jalgaon News: गहाळ झालेले एक लाख शेतकऱ्याला मिळाले परत! प्रवासात बाजरीऐवजी गव्हाची गोणी उचलल्याने घडला प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.