Jayant Patil News: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, मंत्र्यांमध्ये एकवाक्यतेचा अभाव

 jayant Patil
jayant Patilesakal
Updated on

Jayant Patil News : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक भूमिका घेतात; तर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री वेगळी भूमिका घेतात. त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (ता. ३०) येथे सरकारवर केली.

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणाची सरकारने स्वतंत्र चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. (jayant patil statement about cm minister on maratha reservation jalgaon news)

जळगावमधील आक्रोश मोर्चा श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. त्यानिमित्त ते जळगाव दौऱ्यावर आले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाटील यांनी ही टीका केली. माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे उपस्थित होत्या.

जयंत पाटील म्हणाले, की राज्यातील मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन एक भूमिका घ्यावी आणि ती जनतेत जाहीर करावी. मराठा आरक्षणाबाबत सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना दिलेली मुदत आता जवळ आली आहे. तरीही सरकारने मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देणार, याबाबतची भूमिका जाहीर केली नाही. आम्ही वाट पाहत आहोत, सरकार मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेत आहे.

 jayant Patil
Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरू; असं असेल नियोजन

मराठा-ओबीसी तणाव कमी करण्यास अपयश

राज्यात मराठा समाज व ओबीसी समाज यांच्यात तणाव वाढत असल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले, की दोन समाजांत तणाव वाढू नये, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. उलट सरकार तणाव वाढविण्यासाठी प्रयत्न करते आहे की काय, असे आता वाटायला लागले आहे. सरकारने तणाव कमी करण्यासाठी दोन्ही समाजांच्या आरक्षणाबाबत तातडीने भूमिका जाहीर करावी.

जळगाव-नाशिक कनेक्शनचे काय?

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी आता अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या असल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले, की सरकारमधील मंत्र्यांचा या प्रकरणात हात असल्याचे दिसून येत आहे. जळगाव-नाशिक कनेक्शनचे काय? याची आता चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सरकारने स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी.

 jayant Patil
Jayant Patil: तुमचा दावा खोटा; अहवालाचा दाखला देत जयंत पाटलांचा थेट मोदी सरकारवर निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()