Jahangir Art Gallery : खानदेशातील चित्रकारांचे जगप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरी मुंबईत ‘जिविधल’ शीर्षक असलेले समूह चित्रप्रदर्शन ४ ते १० डिसेंबर, या कालावधीत होत आहे. चित्रकार जितेंद्र साळुंके, वीरेंद्र सोनवणे, धनराज पाटील, लक्ष्मीकांत सोनवणे यांनी विविध शैलीतील सामाजिक आशयाची, तसेच नैसर्गिक घटकांची चित्र साकारलेली आहेत.(Jehangir art gallery Group exhibition of paintings from Khandesh on 4 to 10 december jalgaon news)
या चित्रप्रदर्शनात
जितेंद्र साळुंके यांची सामाजिक आशयाची काळ्या शाईतील पेपर माध्यमातील सृजन चित्र रेखाटलेली आहेत. चेहरा हरवलेली माणसे, आक्रोश, यातना, निरागसता असे विषय आहेत. त्यांची हंस, मौज, अनुष्टुभ, कवितारती या दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकांतून रेखाटने प्रकाशित झालेली आहेत. चोपडा पालिकेत ते नोकरीला आहेत.
वीरेंद्र सोनवणे यांची चित्रे माणसांतील प्रवृत्तींना चित्ररूपात मांडत असताना निसर्गातील प्राणी-पक्षी यांच्यातील हिंसकता, लढाऊवृती, भित्रेपणा अशा स्वभाववृती माणसांच्या जगण्यातील आहेत, याचा आशय घेऊन सोनवणे यांनी काळीशाई-पेपरवरील आणि कॅनव्हास चित्रे आशयानुरूप रेखाटलेली आहेत. मुंबई सायन येथे ते कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
धनराज पाटील यांची नैसर्गिक घटकातील पाने, फुले, झाडांचे अमूर्त आकार यांतून चित्र साकारलेली आहेत. पानांचे सूक्ष्म रेखाटन, सुकलेली जीर्ण झालेल्या पानांचे बारकाव्याचे रेखाटन, पांढऱ्या-लाल रंगातील पिंपळपान आकर्षित करतात. जक पारोळा येथे कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
लक्ष्मीकांत सोनवणे यांनी कष्टकरी माणसांचे जगणं कॅनव्हासवर मांडलेले आहे. चित्रकार ग्रामीण भागातील असल्याने परिसरातील माणसांच्या जीवनाचे चित्र कॅनव्हास, काळीशाई या माध्यमात रेखाटलेली आहेत. काळ्या शाईतील सामाजिक आशयातील चित्रे अधिक वेधक ठरतात. शिंदखेडा येथे ते कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ४ डिसेंबरला प्रसिद्ध चित्रकार व सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (मुंबई) या प्रख्यात कला संस्थेतील प्रा. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते होत आहे. अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, दिग्दर्शक राजेश देशपांडे, प्राचार्य राजेंद्र महाजन (चोपडा), हिरामण पाटील (मुंबई), कवी बाळकृष्ण सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.