Jalgaon Crime News : शिक्षिकेने फ्रिझरमध्ये साठवलेले दागिने लंपास

शहरातील आदर्शनगर तन्मय अपार्टमेंट मधील रहिवासी शिक्षिकेच्या घरातून ३ लाख ४५ हजारांचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली.
Jewelery stored in freezer was stolen from teachers house jalgaon crime news
Jewelery stored in freezer was stolen from teachers house jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील आदर्शनगर तन्मय अपार्टमेंट मधील रहिवासी शिक्षिकेच्या घरातून ३ लाख ४५ हजारांचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली.

रामानंदनगर पोलिसात शिक्षिकेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jewelery stored in freezer was stolen from teachers house jalgaon crime news)

घरात काम करणाऱ्या मोलकरीणसह तिच्या मैत्रिणीवर संशय असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. खासगी शाळेतील शिक्षिका अर्चना हितेंद्र ढुमे(वय-४९) या आदर्शनगरात तन्मय अपार्टमेंट(फ्लॅट नं.७) मध्ये एकट्याच राहतात.

त्याच्या घरी विद्या साळुंखे घरकामासाठी येतात. अर्चना ढुमे यांच्या मैत्रिणीकडे नागपूर येथे विवाह सोहळा असल्याने त्या ३० डिसेंबर रोजी पहाटे पाचच्या गाडीने नागपूर येथे गेल्या होत्या.

Jewelery stored in freezer was stolen from teachers house jalgaon crime news
Jalgaon Bribe Crime : अमळनेर येथील लाचखोर हवालदारासह पंटरला अटक

घराची एक चावी शेजाऱ्यांकडे असल्याने ती चावी घेवुन मोलकरीण काम करून निघून जात होती. अशातच दुसऱ्या दिवशी १ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता अर्चना ढुमे लग्नाहुन परतल्या. सकाळी शाळा आल्याने ड्यूटीवर निघून गेल्या.

शाळेतून संध्याकाळी परतल्यावर त्यांनी आपले दागिने ठेवलेल्या फ्रिझरमध्ये पाहिले असता नसल्याचे आढळून आले. संपूर्ण घर शोधून काढल्यावरही दागिने सापडत नसल्याने अखेर त्यांनी रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Jewelery stored in freezer was stolen from teachers house jalgaon crime news
Jalgoan News : साखर, तुरडाळीचे भाव कडाडले; सणासुदीत महागाईचा भडका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.