Jalgaon Crime News : मुलाच्या साखरपुड्यासाठी जळगावला आलेल्या कुटुंबीयांचे धावत्या बसगाडीमधून दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली. शिवकॉलनी थांब्यावर उतरल्यानंतर दागिन्यांची चोरी झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
जवळ ते रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर त्यांना जिल्हापेठ पोलिसांत पाठविण्यात आले. मात्र, इथेही तक्रार न घेतल्याने कुटुंबीय दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रारीसाठी आले होते. (Jewelry stolen from running bus with cash Jalgaon Crime News)
झुरखेडा (ता. धरणगाव) येथील रहिवासी फरजाना दिलावर पिंजारी या व्यवसायानिमित्त कुटुंबीयांसह पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. बुधवारी (ता. ४) पिंजारी कुटुंबीय मुलाच्या साखरपुड्यासाठी जळगावमध्ये आले होते.
सकाळी फरजाना त्यांची बहीण, भाचा व इतर धुळे बसस्थानकातून जळगावला येण्यासाठी बसगाडीमध्ये बसले. दहाला कुटुंबीय शिवकॉलनी थांब्यावर उतरताना बॅगेत ऐवज नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बसगाडी थांबवून चौकशी केली. मात्र, चोरटा पसार झाला होता. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांची कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घालून दिली.
हद्दीचा वाद विकोपाला
जिल्ह्यात दोन पोलिस ठाण्याच्या सामाईक हद्दीत काही घटना घडली की, अंग झटकून तक्रारदाला पिटाळून लावले जाते. चोरी, अपघात, खून अशांची दखल घेतली जात नाही. जळगाव शहरातही प्रत्येक पोलिस ठाण्याच्या सामाईक हद्दीत घडलेल्या घटनांसाठी तक्रारदाराला पिटाळून लावले जाते.
हेच पिंजारी कुटुंबीयांसोबत घडले. मुलाच्या साखरपुड्याचा ऐवज चोरीला गेल्याने महिलेचे अश्रू अनावर झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.