जळगाव : होळीचे रंग देशभरात जसे भिन्न आहेत तशी ती साजरी करण्याची पद्धतही प्रदेश, प्रांतपरत्वे वेगळी आहे.
खानदेशी होळीचे अंगही तसे भिन्न आणि होळीतील (Holi) राजकीय धूळवडीलाही आपल्याकडे विशेष महत्त्व, म्हणून खानदेशी नेत्यांच्या थेट स्वभावसंगतीला साजेसे ‘बुरा न मानो’चे हे चुटुकले वाचकांच्या पसंतीस उतरावेत, अशी अपेक्षा आहे. (joke on direct nature of Khandeshi leaders on bura na mano holi hai jalgaon news)
मंत्री गिरीश महाजन : आहे डोक्यावर फडणवीसांचा हात म्हणूनच करीत आलो सर्वांवर मात
मंत्री गुलाबराव पाटील : खोक्यांचे आरोप करून विरोधक आता दमले चूक कळाली म्हणून ते आमच्यासोबत येऊन रमले
माजी मंत्री सुरेशदादा जैन : पुन्हा रिंगणात उतरून बाजी मी मारणार जळगावकरच मला निवडणुकीत तारणार
आमदार एकनाथ खडसे : घड्याळ्याच्या काट्याने काटा मी काढणार संधी मिळेल तेव्हा ‘कमळा’ला छेडणार
खासदार हीना गावित : प्रवक्ता म्हणून आता संधी मिळाली आहे पक्षाची रणनीती त्यामुळेच कळली आहे
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
मंत्री विजयकुमार गावित : लालदिव्याची गाडी माझी कुठेही वळते त्यामुळेच तर मला रणनीती कळते
खासदार रक्षा खडसे : पुन्हा मिळते का संधी म्हणून आहे मला शंका म्हणूनच तर वाजवते आहे माझ्या कामांचा डंका
खासदार उन्मेष पाटील : मित्र झाला वैरी म्हणून फरक काही पडत नाह कोणावाचून कोणाचे कुठे काही अडत नाही
आमदार मंगेश चव्हाण : चांगल्या चांगल्यांना दाखवीन मी त्यांची जागा म्हणूनच तर सांगतो,की सर्वांशी चांगले वागा
आमदार संजय सावकारे : इधर नही तो उधर सर्वच आहेत आपले म्हणू नका नंतर की नाक आमचे कापले
रवींद्रभय्या पाटील : बँकेच्या माध्यमातूनच विकास आम्ही करू त्यामुळेच ‘भाऊं’ची आता कास आम्ही धरू
आमदार लता सोनवणे : तिकडे गेले म्हणून आता सर्वकाही बरे आहे अण्णासाहेब सांगतात ते देखील खरे आहे
माजी आमदार राजीव देशमुख : चाळीसगावकरांची आम्हीभागवली आहे तहानभविष्यात करायचे आहे आम्हाला कार्य महान
आमदार शिरीष चौधरी : ‘हाता’च्या रेषा पाहूनयोग्य निर्णय घेणार पुन्हा या राज्यात आमचीच सत्ता येणार
रोहिणी खडसे : आमदारकीसाठी आता कसली आहे कंबर बाबांमुळेच आपला राहणार एक नंबर
माजी मंत्री गुलाबराव देवकर : जळगाव ग्रामीणला आता केले आहे लक्ष जिल्हा बँक सोडून आता तिकडेच राहणार दक्ष
आमदार चिमणराव पाटील : आडवे आले ‘गुलाब’ म्हणून गेली लाल दिव्याची गाडी लवकरच आमच्या हाती येईल त्यांची नाडी
आमदार किशोर पाटील : मतदारसंघात रचली होती विकासाची गाथा मंत्रिपद मिळण्याआधीच ताई’ची आली बाधा
उल्हास पाटील : हाताच्या साथीवर दिल्लीवारीची आस आहे कन्येच्या भवितव्यासाठी आमदारकीच खास आहे
आमदार सुरेश भोळे : भरीव निधी आणूनही खड्डे काही भरत नाहीएवढे करूनही म्हणतातआमदार काही करत नाही
संजय पवार, जिल्हा बँक संचालक : भाऊ, अण्णा, दादासर्वांचीच घेईन म्हणतो साथ बँकेत चेअरमनपदासाठी विरोधकांवर करीन मात
डॉ. सतीश पाटील : ‘कमळ’ धुडकावून ‘घड्याळा’शीतुटू दिली नाही नाळ आता तरी आमदारकीची गळ्यात पडेल का माळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.