Jalgaon Kanbai Utsav : जिल्ह्यात घरोघरी कानुबाई उत्सव उत्साहात साजरा; महिलांनी झिम्मा खेळत कानबाईची गायली गाणी

Kanubai and Rota were worshiped everywhere in the district.
Kanubai and Rota were worshiped everywhere in the district. eskal
Updated on

Jalgaon Kanbai Utsav : श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने नागरिकांनी घरोघरी साजरा केला. यानिमित्ताने बाहेरगाव राहत असलेले कुटूंब एकत्र आल्याचे चित्र होते.

दिवसभर उपवास करून सायंकाळी कानबाईचे पूजन, आरतीनंतर पुरणपोळी, साखर (खीर) नैवेद्य दाखविण्यात आला. भाविकांना साळीच्या लाह्या, बत्ताशांचा प्रसाद देण्यात आला. अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत कानबाईची गाणी म्हणत रात्र जागविली. (Kanbai utsav celebrated in jalgaon news)

कानबाई असलेल्या घरात एकत्र कुटुंब असेल, तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य, म्हणजे गहु, चण्याची दाळ घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वयंपाकात जास्त वापर केला गेला. पुरण पोळी, खीर, कटाची आमटी चण्याची डाळ घालुन, गंगाफळाच्या भाजीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

काही भाविकांच्या घरी केवळ रोटांचा कार्यक्रम होतो. कानबाईची विधिवत पूजा न मांडता रोटांना पूजिले जाते. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता, नवस केला असेल, तर तो फेडण्यासाठीही गर्दी झाली होती. आपल्या घरी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद देण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kanubai and Rota were worshiped everywhere in the district.
Devotional India : देशातल्या या मंदिरात देवाच्या प्रसादाला असते बोकड, बिर्याणी अन् ताडी!

आज विसर्जन

सोमवारी (ता. २८) सकाळी लवकर उठून कानबाईच्या विसर्जन केले जाणार आहे. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवण्यात येईल. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतील. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेवून बायका नदीवर निघतात. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात.

वाजत गाजत जाताना समोरुन दुसरी कानबाई आली, तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले, तर त्याही स्थितीत ती नाचते; पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.

नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ, तसेच डोक्यावर घेऊन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात.

Kanubai and Rota were worshiped everywhere in the district.
Kanbai Utsav 2023 : ‘वई वई येजो व मनी कानबाई माय’चा गजर; हजारो भाविकांच्या उपस्थितीत कानुबाईमातेला निरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.