Kartiki Ekadashi 2023: श्रीराम रथोत्सवासाठी जळगाव नगरी सज्ज! दुपारी बाराला सुरुवात

Kartiki Ekadashi 2023 Shri Ram Rathotsav starts at 12 noon jalgaon news
Kartiki Ekadashi 2023 Shri Ram Rathotsav starts at 12 noon jalgaon news
Updated on

Kartiki Ekadashi 2023: नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेले जळगावमधील श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) तर्फे कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त गुरुवारी (ता. २३) श्रीराम रथोत्सव होईल. रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. पहाटे चारला काकड आरती.

प्रभू श्रीराम उत्सव मूर्तीस अभिषेक, सकाळी सातला महाआरती, साडेसात ते साडेआठला सांप्रदायिक परंपरेचे भजन आणि त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहाला श्रीराम रथाचे महापूजा वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेद मंत्रघोषात होईल. (Kartiki Ekadashi 2023 Shri Ram Rathotsav starts at 12 noon jalgaon news)

मंगेश महाराजांच्या हस्ते रथाचे पूजन व महाआरती होईल. संस्थानतर्फे उपस्थित प्रमुख अतिथी व रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर श्रीराम रथावर आरूढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सव मूर्तीची आरती होऊन रथात मूर्ती विराजमान होईल. रथावर गरुड, मारुती, अर्जून, दोन घोडे आदी मूर्ती असतील.

रथाच्या अग्रभागी सनई, नगारा, चौघडा, झेंडेकरी, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ आणि आसपासच्या खेड्यातील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ असा जलग्राम नगर दिंडी प्रदक्षिणा म्हणजेच रथयात्रेस दुपारी बाराला श्रीरामांच्या जयघोषात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथून प्रारंभ होईल.

Kartiki Ekadashi 2023 Shri Ram Rathotsav starts at 12 noon jalgaon news
Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या

दुपारी साडेबाराला जुन्या जळगावातील प्रगतिशील शेतकरी (स्व.) एकनाथ बंडू खडके यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही रामपेठेत त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांतर्फे रथाचे पूजन होईल.

असा राहील मार्ग

रथ प्रस्थानाचा मार्ग श्रीराम मंदिर , भोईटेगढी ,आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिर, चैतन्य मेडिकल समोरून, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होऊन श्रीमरी माता मंदिर भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशहा बाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक पुष्प हार अर्पण करतील. बालाजी मंदिर, रथ चौकात रथ रात्री बारापर्यंत परत येईल. रामांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत-गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येतील. इथे प्रभू श्रीरामचंद्रांची शेजारती होईल.

Kartiki Ekadashi 2023 Shri Ram Rathotsav starts at 12 noon jalgaon news
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिक एकादशीनिमित्त उद्या श्रीराम मंदिरातर्फे रथोत्सव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.