Jalgaon KBCNMU News : प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेशाला 10 मेपर्यंत मुदत; येथे करा अर्ज

KBCNMU
KBCNMUesakal
Updated on

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाद्वारे सुरू केलेल्या विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाला १० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (kbcnmu Certificate course admission deadline is May 10 jalgaon news)

या विभागाकडून मोडीलिपी या शिक्षणक्रमांसोबत लिंग संवेदनशीलता, सायबर गुन्हे आणि कायदे, बौद्धिक संपत्ती हक्क, मानसशास्त्रीय कसोट्या आणि मोजमाप, संशोधन पद्धतीची मूलतत्वे, संशोधनासाठी संबधित साहित्य आणि ग्रंथसूची लेखन, संशोधन प्रस्ताव लेखन, एसपीएसएसद्वारे संशोधन माहिती विश्लेषण, संशोधन अहवाल आणि पेपर प्रकाशन शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत.

या शिक्षणक्रमांची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता १० मेपर्यंत ऑनलाईन प्रवेश सुरू राहणार आहेत. ऑनलाईन प्रवेशासाठी https://nmu.ac.in/external-education/en-us/Programmes/Certificate-Program Click on Certificate Program link देण्यात आली आहे, अशी माहिती या विभागाच्या संचालक डॉ. मनीषा इंदाणी यांनी दिली.

KBCNMU
Jalgaon Unseasonal Rain : भुसावळ पट्ट्यात वादळी पावसाचे थैमान; जामनेर तालुक्यात गारपीट

आजीवन अध्ययन विभाग अभ्यासक्रम सुरू करणार

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे. या विभागाच्या संलग्नतेने विविध महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था, अशा २३ ठिकाणी कौशल्य आणि रोजगाराभिमुख ११४ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत, तसेच पाच ठिकाणी मार्गदर्शन व समुपदेशन पदव्युत्तर आणि इतर विषयांवरील १६ पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात विविध महाविद्यालयांकडून प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. योग्य असलेल्या प्रस्तावाना मान्यता दिली जाईल. याबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे, असे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी कळविले आहे.

KBCNMU
Jalgaon Municipal Corporation : अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची महापालिकेची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.