जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत बुधवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पाच निकाल हाती आले.
पाचही राखीव जागांचे निकाल विद्यापीठ विकास मंचच्या बाजूने लागले. उर्वरित खुल्या संवर्गातील पाच जागांपैकी विकास मंचचे चार उमेदवार आघाडीवर होते. (KBCNMU Election results of all 5 reserved seats were in favor of University Development Forum Jalgaon news)
राखीव जागांमधील अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर, विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगातुन दिनेश चव्हाण, महिला संवर्गातून स्वप्नाली महाजन, इतर मागास संवर्गातून नितीन झाल्टे, अनुसूचित जाती संवर्गातून दिनेश खरात हे पाचजण विजयी झाले.
रविवारी (ता.२९) विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर सरासरी ४९ टक्के मतदान झाले होते. दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणी बुधवारी सकाळी आठपासून सुरु झाली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी कोटा निश्चित करण्यात आला. सायंकाळी साडेपाचला पहिला निकाल हाती आला.
राखीव जागा विकास मंचकडे
अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर व भिमसिंग वळवी हे दोघे उमेदवार उभे होते. एकूण ११ हजार १४१ मतांपैकी ८५१ मते अवैध ठरली. नितीन ठाकूर यांना ७ हजार ६७६ मते प्राप्त झाली
तर भिमसिंग वळवी यांना २ हजार ६१४ मते मिळाल्यामुळे ठाकूर यांना विजयी घोषित करण्यात आले. विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगातून दिनेश चव्हाण विजयी झाले. त्यांना ७ हजार १५१ तर प्रतिस्पर्धी नितीन नाईक यांना २ हजार २९२ व सचिन जाधव यांना ७४३ मते मिळाली. या संवर्गात ९५५ मते अवैध ठरली.
महिला संवर्गात स्वप्नाली महाजन यांना पहिल्या फेरीत कोट्यापेक्षा अधिक मते प्राप्त झाल्याने विजयी घोषित करण्यात आले. या संवर्गात वंदना पाटील यांना २ हजार ४६७, भाग्यश्री महाजन यांना ७२३ तर ज्योती कढरे यांना ५४७ मते प्राप्त झाली. या संवर्गात १ हजार १६६ मते अवैध ठरली.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
अनुसूचित जाती संवर्गात ४ उमेदवार उभे होते. विजयी होण्यासाठी ५ हजार ७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. ९९० मते अवैध ठरली या संवर्गात दिनेश खरात यांना ६ हजार ७१९ मते प्राप्त झाल्याने विजयी घोषित करण्यात आले.
नागसेन पेंढारकर यांना २ हजार ४७१, भगवान अंकुश यांना ६७९, राकेश महिरे यांना २८२ मते मिळाली. इतर मागास संवर्गात नितीन झाल्टे हे ६ हजार ८६० मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्रकुमार बोरसे यांना २ हजार ५१९, योगेश भावसार यांना ७४६ मते प्राप्त झाली. यासंवर्गात ५ हजार ६३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. १ हजार १६ मते अवैध ठरली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.