Jalgaon KBCNMU News :क्वीक हिल फाउंडेशनचे ‘उमवि’स तीन पुरस्कार

KBCNMU
KBCNMUesakal
Updated on

Jalgaon KBCNMU News : सायबर सुरक्षितता जनजागृतीसंदर्भात पुण्याच्या क्वीक हिल फाउंडेशनतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास तीन पुरस्कार प्राप्त झाले. (kbcnmu received 3 awards from pune Quick Heal Foundation jalgaon news)

विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतर्फे सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात आली. क्वीक हिल फाउंडेशनने या कार्याची दखल घेत प्रशाळेतील धनराज बोंडे (एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स) व मानसी बोरोले (एमसीए) या विद्यार्थ्यांना सायबर एज्युकेशन चॅम्पियन ऑफ द इयर ॲज आऊटस्टँडींग परफॉर्मन्स ॲवार्ड,

प्रशाळेतील शिक्षक राजू आमले यांना सायबर सुरक्षा चॅम्पियन ऑफ द इयर ॲज एक्स्ट्रा माईल रिकग्नेशन ॲवार्ड आणि संगणकशास्त्र प्रशाळा व विद्यापीठास ‘सायबर एज्युकेशन चॅम्पियन ऑफ द इयर ॲज स्पेशल ॲप्रीसिएशन फॉर मीडिया ऑऊटरिच ॲवार्ड’ देण्यात आले. हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथे देण्यात आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

KBCNMU
Market Committee Election : डॉ. सतीश पाटील यांच्या अर्जांसह रेखा पाटलांचाही अर्ज अवैध

या कार्याची दखल

विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळा आणि क्वीक हिल फाऊंडेशनच्या संयुक्त करारांतर्गत सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा, कमवा व शिका योजनेत ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ३८ स्वयंसेवकांनी विद्यापीठांतर्गत असलेल्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील ग्रामीण व शहरी भागातील जवळपास २५० शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन सायबर सुरक्षेवर प्रबोधन केले.

या स्वयंसेवकांनी जवळपास एक लाख ४० हजार विद्यार्थी व विद्यार्थिनींचे सायबर सुरक्षेवर प्रबोधन केले. त्यात विशेष म्हणजे आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील १० आदिवासी आश्रमशाळा, तसेच यावल तालुक्यातील २० उर्दू शाळा व महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. या कार्याची दखल घेत हे पुरस्कार देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशाळेचे संचालक प्रा. सतीश कोल्हे यांनी दिली.

KBCNMU
Jalgaon News : ‘उन्मेष पॅटर्न’ राज्यभर राबवणार; शासनाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.