Jalgaon NMU News : 5 वर्षांत 89 महाविद्यालये, 30 स्टार्टअप सुरू करणार; उमविच्या बृहत आराखड्यात शासनाकडे शिफारस

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal
Updated on

Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २०२४-२५ ते २०२८-२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्याला अधिसभेने मान्यता देऊन शासनाकडे शिफारस केली आहे.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २४) अधिसभेची बैठक झाली. तीत प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी सांगितले, की पंचवार्षिक बृहत आराखडा शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यासाठी कुलगुरूंनी २४ सदस्यीय समिती नियुक्त केली होती. (kbcnmu will start 89 colleges 30 startups in 5 years jalgaon news)

या बृहत आराखड्यासाठी पालक, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञांकडून लिंकद्वारे प्रश्नावली भरून घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्याही सूचना मागविण्यात आल्यात. प्राप्त डाटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर हा आराखडा तयार करण्यात आला.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा सकलप्रवेश दर वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती दिली.

प्रा. एकनाथ नेहते, विष्णू भंगाळे, प्रा. जयवंत मगर, नितीन ठाकूर, प्राचार्य एस. एन. भारंबे, प्राचार्य के. बी. पाटील, विलास जोशी, प्रा. अनिल पाटील, डॉ. मंदा गावित, प्रा. अजय पाटील, अमोल मराठे, अमोल सोनवणे आदींनी चर्चेत भाग घेऊन काही सूचना केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon: अतिक्रमित गायरान जागेच्या मालकीचा निर्णय कधी? रावेर तालुक्यातील ग्रामस्थ भेटले जिल्हाधिकाऱ्यांना

या आहेत शिफारसी

या आराखड्यात पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ८९ महाविद्यालये सुरू करण्याची शिफारस केली आहे. या भागातील गरजा आणि आदिवासी भाग लक्षात घेत त्यात चार रात्रीची महाविद्यालये सुरू करणे, सोबतच पाच महिला महाविद्यालये, ३२ कौशल्यवर्धन महाविद्यालये, नऊ कौशल्यज्ञान पुरविणाऱ्या संस्था, ११ समाजकार्य महाविद्यालये, आठ कला व ललित कला महाविद्यालये, चार विशेष शिक्षण शास्त्र महाविद्यालये, दोन फॅशन डिझाईन महाविद्यालये,

दोन बीएस्सी हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालये, एक नर्सिंग, दोन फार्मसी आणि तीन विधी महाविद्यालये पुढील पाच वर्षांत सुरू करण्याची शिफारस केली आहे. पुढील पाच वर्षांमध्ये तीनही जिल्ह्यातील सकलप्रवेश दर (जीईआर) पाच टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

नंदुरबार येथील आदिवासी अकादमी काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. विद्यापीठातील कवयित्री बहिणाबाई चौधरी इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲड लिंकेजेस केंद्रातर्फे पुढील पाच वर्षांत ३० स्टार्टअप सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Eknath Khadse : माध्यान्ह भोजन योजनेत राज्यात गैरव्यवहार; खडसेंची विधान परिषदेत ‘लक्षवेधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.