Jalgaon News : फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असताना एकनाथ खडसेंवर पॉलिहाउससाठी अनुदान लाटल्याचा आरोप करणाऱ्या विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात खडसेंनी पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून, त्यावर मंगळवारी पुन्हा कामकाज होणार आहे.
२०१६ मध्येच हा दावा दाखल करण्यात आला होता. मात्र वादी-प्रतिवादी सतत गैरहजर राहिल्याने दावा रद्दबातल करण्यात आला.
खडसेंनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात अपील केल्यानंतर खंडपीठाने या दाव्यावर कामकाज चालवावे, असे निर्देश दिल्यानंतर हा दावा नव्याने कामकाजासाठी दाखल करण्यात आला.(Khadse defamation claim of 5 crores against guardian minister Re filing of suit by direction of bench Hearing today Jalgaon News)
असे आहे प्रकरण
या दाव्याची पार्श्वभूमी अशी की, सन २०१६ मध्ये खडसे महसूल व कृषिमंत्री असताना तत्कालीन सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री असलेल्या व आताचे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर पॉलिहाउससाठी अनुदान लाटल्यासह अन्य आरोप केले होते.
हे आरोप करताना त्यांनी कुठलेही पुरावे सादर केले नाहीत. म्हणून त्या वेळी खडसेंनी पाटलांवर मानहानीचा दावा दाखल केला. नंतरच्या काळात गैरहजेरीमुळे हा दावा रद्दबातल करण्यात आला.
खडसेंनी हा दावा नव्याने चालविण्यात यावा म्हणून संभाजीनगर खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यावर नुकतीच सुनावणी होऊन खंडपीठाने सत्र न्यायालयात दावा चालविण्यासंदर्भात निर्देश दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार सोमवारी या दाव्यावर न्या. नायगावकर यांच्या न्यायालयात कामकाज झाले. खडसेंच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. या वेळी मंत्री गुलाबराव पाटलांचे नाव दोनदा पुकारण्यात आले. मात्र ते अथवा त्यांच्याकडून वकीलही हजर नव्हते. त्यामुळे मंगळवार (ता. २०)पासून या दाव्यावर कामकाज होणार आहे. खडसेंकडून ॲड. प्रकाश पाटील काम पाहत आहेत.
माफी मागितली, तर मार्ग निघेल
या दाव्यावर कामकाज होत असताना खडसे स्वत: न्यायालयात हजर होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. कोणताही पुरावा नसताना गुलाबराव पाटलांनी माझ्यावर बेछूट आरोप केले. त्यामुळे आपण दावा दाखल केला. या प्रकरणी त्यांनी माफी मागितली, तरी त्यातून मार्ग निघू शकेल, असे संकेत त्यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.