Eknath Khadse News : केळीवरील ‘सीएमव्ही’च्या मुद्द्यावर खडसे आक्रमक; विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्तांसाठी १९ कोटी ७३ लाख ४४ हजार रुपये निधी शासन स्तरावरून मंजूर केल्याची माहिती सभागृहाला दिली.
Khadse is aggressive on issue of CMV on banana crop jalgaon news
Khadse is aggressive on issue of CMV on banana crop jalgaon newsesakal
Updated on

Eknath Khadse News : जिल्ह्यात केळी पिकावर कुकुंबर मोझाक विषाणू (सीएमव्ही) च्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याच्या मुद्द्यावर आमदार एकनाथ खडसे यांनी विधानरिषदेत आक्रमक पवित्रा घेत या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी काय उपाययोजना केल्या, असा तारांकित प्रश्नही उपस्थित केला.

त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्तांसाठी १९ कोटी ७३ लाख ४४ हजार रुपये निधी शासन स्तरावरून मंजूर केल्याची माहिती सभागृहाला दिली.(Khadse is aggressive on issue of CMV on banana crop jalgaon news)

जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ या कालावधीत केळी पिकावर कुकुंबर मोझाक विषाणू (सीएमव्ही) च्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून ऑक्टोबर २०२२ व मार्च २०२३ मध्ये जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे दोन प्रस्ताव पाठविले.

दोन्ही प्रस्तावांमध्ये रुपये २७ कोटी रक्कमेची तफावत आहे. या प्रकरणी शासनाने काय चौकशी केली, तसेच सीएमव्ही या रोगाचे उच्चाटन करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, याबाबत आमदार खडसे यांनी मुद्दा मांडला.

आमदार खडसे यांच्या प्रश्नाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर कुकुंबर मोझाक विषाणू (सीएमव्ही)च्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे दोन प्रस्ताव पाठविले असून, दोन्ही प्रस्तावामध्ये रुपये २७ कोटी रकमेची तफावत आहे.

Khadse is aggressive on issue of CMV on banana crop jalgaon news
Eknath Khadse News : सीएमव्हीग्रस्तांना आठवडाभरात भरपाई द्यावी; एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री कृषिमंत्र्यांकडे मागणी

संचालक (फलोत्पादन), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी जिल्ह्यातील केळी पिकाचे सीएमव्ही रोगामुळे एकूण ८ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रासाठी पुनर्लागवडीसाठी आवश्यक केळी रोपे खुल्या बाजारातील ऊती संवर्धित केळी रोपांच्या रुपये १५ प्रति रोपनुसार रुपये ५८४६.६४ लाख एवढा निधीचा प्रस्ताव शासनास सादर केला.

'तसेच, विभागीय आयुक्त, नाशिक यांनी महसूल व वन विभागाने २२ ऑगस्ट, २०२२ ला निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील मदतीच्या दराप्रमाणे (फळपिकांसाठी रुपये ३६ हजार प्रति हेक्टर) जिल्ह्यातील केळी पिकावरील कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही) रोगाचा प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसाठी एकूण क्षेत्र ८ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रासाठी रक्कम रुपये ३१ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये रकमेचा मागणी प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

समूळ उच्चाटनासाठी उपाययोजना

महसूल व वन विभागाने शासन निर्णय ५ सप्टेंबर २०२३ नुसार केळी पिकावर कुकुंबर मोझाक विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १९ कोटी ७३ लाख ४४ हजार रुपये निधी शासनस्तरावरून मंजूर करण्यात आला आहे. सीएमव्ही रोगाचे उच्चटन व व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध करणे, ऑनलाइन सभा, शेतकरी मेळावे, शेतीशाळा आयोजन, शास्त्रज्ञ भेटी आदी कामे नियमित करण्यात येत आहेत.

Khadse is aggressive on issue of CMV on banana crop jalgaon news
Eknath Khadse News : मुक्ताईच्या कृपेने ‘कार्डियाक ॲरेस्ट’मधून वाचलो; मुख्यमंत्र्यांचेही मानले आभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.