Eknath Khadse News : शहरात गावठी कट्ट्यांतून गोळीबार करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत जिल्ह्यातून तब्बल ५० गावठे कट्टे जप्त केले.
मात्र, उमर्टी (ता. चोपडा) येथे असलेला गावठी कट्टा कारखाना बंद करण्याची कारवाई कधीच करण्यात आली नाही. (Khadse question on efficiency of police in umarthi Gavthi Katta factory jalgaon news)
पोलिसांची ही अकार्यक्षमता असून, पोलिस तत्परता दाखवतील काय, असा प्रश्न माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता. २८) विधान परिषदेत उपस्थित केला.
येथील कानळदा रोडवर एका टोळक्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. त्याबाबत आमदार खडसे यांनी विधान परिषदेत पॉइंट ऑफ इर्न्फेमेशनद्वारे प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, की शहरात गुरुवारी (ता. २७) गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीही जिल्ह्यात अशीच घटना घडली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिसांनीही आतापर्यंत ५० गावठे कट्टे जप्त केले आहेत. आणखी काही कट्टे असू शकतात. उमर्टी येथे गावठी कट्ट्यांचा कारखाना आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली. मात्र, पोलिस व त्यांचे चांगले संबंध असल्याने ते पुन्हा सुरू झाले आहेत.
पण, आता हे कट्टे संपूर्ण राज्यभर होत आहेत, ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी कारवाई करून हा कारखाना बंद करणे गरजेचे आहे. पोलिस ही कार्यक्षमता दाखवतील काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.