अमेरिकेत रंगला खानदेशी स्नेहमेळावा; लेवा पाटीदार समाजाचा पुढाकार

जगाचा असा कोणताच कानाकोपरा नाही की त्या देशात खानदेशी पोहचले नाहीत.
Gathering
Gatheringesakal
Updated on

सावदा (ता. रावेर) : जगाचा असा कोणताच कानाकोपरा नाही की त्या देशात खानदेशी पोहचले नाहीत. अमेरिकेत तर नोकरी, व्यवसायानिमित्ताने अनेक शहरात मोठ्या संख्येने खानदेशी लोक आहेत. न्यू जर्सी येथे नुकताच भारतीय लेवा समाज बांधवांचा वार्षिक स्नेहमेळावा पार पडला. हा स्नेहमेळावा भारतीयांना अनुभवता यावा, यासाठी ‘सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आले होते. न्यू जर्सी शहरातील निसर्गरम्य उद्यानात हा स्नेहमेळावा झाला. या वेळी न्यू जर्सी व आजूबाजूच्या शंभर मैलाच्या परिसरातील आणि त्यापेक्षाही लांबून ४५० समाजबांधव सहभागी झाले.

Gathering
Fitness : बेडवरच करा ही ३ योगासने आणि घटवा वजन

आजीबाईंनी लाटल्या पुऱ्या

या संमेलनासाठी मूळ गाव मलकापूर येथील ९५ वर्षीय आजीबाई आल्या होत्या. त्यांनी व्हीलचेअरवर बसून पुऱ्या लाटल्या तर अकोल्याचे चंद्रशेखर वराडे यांची स्नेहमेळाव्यात अचानक भेट झाली. अशोक चौधरी, (झोडगा, मलकापूर), श्री. खाचणे, प्रमोद अत्तरदे, मुकुंद नेमाडे, रवींद्र भंगाळे, देवेंद्र नेहेते आणि प्रफुल्ल बारहाते आदी उपस्थित होते. विशेष कार्यक्रम प्रायोजित प्रीती कोलते, नितीन कोलते, मीनल आणि राजेश इंगळे आदींनी या स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट नियोजन केले. तन्वी पाटील या चिमुरडीने ‘अच्युतम केशवम’ हे भजन आपल्या सुरेल आवाजात गायले. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून मोठी दाद दिली तर विविध स्पर्धा पार पडल्या.

Gathering
Dahi Vada: असा बनवाल टेस्टी दहीवडा तर बोट चाखत रहाल; जाणून घ्या रेसिपी

जेवणात खानदेशी मेनू

स्नेहमेळाव्यात सर्वांना नाश्त्यात रव्याचा घाटा, भेळ, जेवणासाठी खास वांगी भाजून तयार केलेले भरीत, शेवभाजी, सलाद, ताक, मिरच्यांचा ठेचा आदी मेनू तयार करण्यात आला होता. सर्व समाजबांधवांनी त्याचा आस्वाद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.