Jalgaon Kharif Season : कृषी विभागाच्या भरारी पथकांची करडी नजर; शेतकऱ्यांना दक्षतेचे आवाहन

Bharari team inspecting the agricultural center
Bharari team inspecting the agricultural center esakal
Updated on

Jalgaon Kharif Season : तालुक्यात एक जूनपासून बियाणे विक्री सुरू झाली असून, शेतकऱ्यांची देखील बियाणे खरेदीची लगबग सुरू केलेली आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार व वाजवी दरात बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शहरात व कजगाव परिसरात अचानक भरारी पथकाद्वारे कृषी केंद्रांच्या तपासणी सुरू करण्यात आलेल्या आहेत. (kharif season Inspection of agricultural centre was started by Bharari team jalgaon news)

तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पंचायत समितीचे कृषी अधिकारी ईश्वर देशमुख, कजगाव मंडळ कृषी अधिकारी आर. बी. राठोड, भडगाव मंडळ कृषी अधिकारी एम. जे. वाघ हे सदस्य असून, महेश वाघ हे भरारी पथकाचे सदस्य सचिव आहेत. कृषी केंद्रांच्या तपासणीदरम्यान साठा नोंद वही अद्यावत नाही, परवाना दर्शनी स्थळी लावलेला नाही, साठा फलक अद्यावत नाही, अशा किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्यामुळे संबंधितांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

तसेच गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास संबंधित बियाणे विक्री केंद्राचे परवाने निलंबनाची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे पथकाचे अध्यक्ष बी. बी. गोरडे यांनी सांगितले. यावर्षी स्वदेशी ५ हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार नसल्याने कोणीही ते खरेदी करू नये.

तसेच तणनाशकाला सहनशील असलेले एचटीबीटी हे प्रतिबंधित बियाणे खरेदी करू नये, अशा प्रकारचे बोगस बियाणे अनधिकृत वा खासगी व्यक्तीद्वारे विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित कृषी विभागात तक्रार करण्यात यावी. तसेच चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित कृषी विभागास संपर्क करून फसवणूक टाळावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bharari team inspecting the agricultural center
Kharif Season : खरिपासाठी राज्यात 75 हजार टनाच्या रासायनिक खतांचा होणार ‘बफर स्टॉक'!

..तर कृषी केद्रांचे परवाने निलंबित

खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकऱ्यांना दर्जेदार व वाजवी दरात बियाणे उपलब्ध व्हावे, त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी भरारी पथकाची करडी नजर असून, अचानक कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. ज्या कृषी केंद्रात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून येतील त्यांचे परवाने निलंबन करण्यात येणार आहे.

सर्व बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार व वाजवी दरातच बियाणे उपलब्ध करून द्यावे, मुदतबाह्य किंवा चढ्यादराने बियाण्याची विक्री करू नये, असे आढळून आल्यास संबंधित विक्री केंद्रावर कारवाई करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी अधिकृत खरेदीची पक्की पावती अथवा बिल प्राप्त करून घ्यावे. तसेच शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नये.

"बीजप्रक्रिया व उगवणक्षमता तपासूनच, ७५ ते १०० मी.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. तसेच अधिकृत कृषी केंद्रचालकांकडून चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी." - बी. बी. गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव

Bharari team inspecting the agricultural center
Jalgaon News : एकता महिला मंडळाची दुःखावर फुंकर! निधन झालेल्या समाजबांधवांच्या घरी पोचवणार शिदोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()