Monsoon Kharif Season: अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या पेरण्या केवळ 15 टक्के; कापसाचा पेरा अधिक

Kharif Season Sowing
Kharif Season Sowingesakal
Updated on

Monsoon Kharif Season : शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९२.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून महिना उलटून जुलै सुरू झाला, तरी अद्यापपर्यंत पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. मुंबई, पुणे येथे चांगला पाऊस पडत आहे.

यामुळे आपल्याकडेही पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत केवळ १५ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. (Kharif sowing only 15 percent due to scanty monsoon rainfall More cotton seeds jalgaon)

जून महिन्याचे २६ दिवस पावसाअभावी कोरडे गेले. नंतर थोडाफार पाऊस झाला. मात्र, दमदार पावसाची अद्याप प्रतिक्षा आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरण्या केल्या. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आता पाऊस येईल, या आशेवर कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरण्यांना सुरवात केली आहे.

आतापर्यंत कापसाचा पेरा १ लाख १४ हजार ८७९ हेक्टरवर झाला आहे. सोयाबीनचा पेरा १५ हेक्टरवर, तर भुईमुगाचा पेरा २ हेक्टरवर झाला आहे. उडीद, मूग, तुरीच्या पेरण्या झालेल्या नाहीत. आतापर्यंत १ लाख १९ हजार १९९ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.

१५ जुलैपर्यंत पेरण्या करता येतील

उडीद, मूग वगळता कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर या पिकांच्या पेरणया १५ जुलैपर्यंत करता येतील. आता मात्र पावसाने वेग घेतला पाहिजे. किमान आगामी आठ दिवसांत दमदार पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्या पूर्ण होतील, अशा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kharif Season Sowing
Monsoon Health Tips : पावसाळ्यात या भाज्यांपासून दूर राहीलेलंच फायद्याचं ठरेल!

तालुकानिहाय झालेल्या पेरण्या अशा

तालुका---पेरण्या (हेक्टर)--टक्केवारी

जळगाव--७ हजार ६००--१४

भुसावळ--४५०--२

बोदवड--१ हजार ५००--५

यावल--२ हजार ५७९--६

रावेर--९८७--३

मुक्ताईनगर--६ हजार १८५--२१

अमळनेर--१३ हजार ३७०--१९

चोपडा--६ हजार--९

एरंडोल--८६०--२

धरणगाव--९ हजार २००--२०

पारोळा--२१ हजार २४५--४१

चाळीसगाव--१९ हजार ४६९--२३

जामनेर--९ हजार २१४--९

पाचोरा--१८ हजार ९००--३३

भडगाव--१ हजार ६४०--५

एकूण--१ लाख १९ हजार १९९--१५

Kharif Season Sowing
Monsoon Tourism : एकावर एक फ्री! या ठिकाणी देवादर्शनासह घेता येईल पावसाळ्याच्या सहलीचा आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.