जळगाव : मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणारे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी मंगळवार (ता. ११)पासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन उपोषणाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.(Kirankumar Bakale Case Chain hunger strike for arrest of suspended Bakale jalgaon Crime news)
पोलिस निरीक्षक बकाले यांना त्वरित अटक करण्यात यावी, लोकमानसाचा आदर करण्यात यावा, बकाले यांना बडतर्फ करण्यात यावे, बकाले व महाजन यांच्यात संभाषण झालेला मोबाईल हॅंडसेट तत्काळ मुद्देमाल म्हणून जप्त करावा, बकाले यांच्या संपत्तीची चौकशी करून बेकायदा संपत्ती तत्काळ सरकारजमा करावी, आम्ही सर्व समाजाचे, जातिधर्माचे लोक एकत्र येत महिलांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या, एखाद्या समाजाबद्दल अपशब्द वापरून तेढ निर्माण करणाऱ्या शासकीय सेवेतील या व्यक्तीला तत्काळ अटक करावी व पोलिस प्रशासनाने या कार्यवाहीत कुठलीही कसूर करू नये, एक महिना होऊनही कार्यवाही होत नरोल तर समाजामध्ये पोलिस प्रशासनाबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण होईल, याबाबत दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सकल मराठा समाजाचे राम पवार, हिरामण चव्हाण, डॉ. संभाजी देसाई, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, धवल पाटील, वाल्मीक पाटील, सुनील पाटील, प्रफुल्ल पाटील, रमेश बाऱ्हे, उज्ज्वल पाटील, विवेक बोढरे, मिलिंद सोनवणे, अमोल बाविस्कर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.