Kirankumar Bakale Controversy : न्यायालयाने ऐकले बकाले-महाजन यांचे वादग्रस्त संभाषण!

kirankumar bakale
kirankumar bakaleesakal
Updated on

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह्य वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व हजेरी मास्तर अशोक महाजन यांच्या संभाषणाची ती वादग्रस्त ऑडिओ क्लिप न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयाने संपूर्ण क्लिप ऐकल्यानंतर महाजन यांच्या जामीनावर गुरुवार (ता. २०) रोजी कामकाज होणार आहे.

जिल्‍हा व सत्र न्यायालयात गुन्हेशाखेचा तत्कालीन हजेरी मास्तर अशोक महाजन याच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्या अर्जाच्या कामकाजात आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे म्हणत साक्षीदार किरण बोरसे आणि पाचोरा येथील पाटील अशा दोघांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता.(Kirankumar Bakale Controversy court heard conversation of Bakale-Mahajan Jalgaon News)

kirankumar bakale
Diwali Update : ऐन दिवाळीत सोयाबीन तेल महागले

महाजन यांचे वकील ॲड. केदार भुसारी यांनी अशोक महाजन व किरणकुमार बकाले यांच्यातील मोबाईल संभाषणाची ऑडीओक्लिप असलेला पेनड्राईव्ह न्यायालयात सादर केला. न्या. एस. एन. माने (गाडेकर) यांच्या न्यायालयाने दोन वेळेस ही ऑडिओ क्लिप शांतपण ऐकली. त्यावर ॲड. भुसारी यांनी त्यांचे म्हणणे सादर केले. सलग दोन दिवस या प्रकरणावर युक्तिवाद झाल्यावर गुरुवार(ता.२०) रोजी उर्वरित कामकाज होणार आहे.

बकालेंनाही गुरुवार

किरणकुमार बकाले यांचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊन त्यावर गुरुवार (ता.२०) रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

kirankumar bakale
Jalgaon : बस- कंटेनर अपघातात 38 प्रवासी जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.