Pachora Market Committee Election : पाचोरा-भडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत खऱ्या शिवसेनेची खऱ्या भाजपसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती असून निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवू, असा विश्वास आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांनी व्यक्त केला. (kishor patil statement about pachora market committee election alliance with bjp jalgaon news)
येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील, पाचोरा शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील, वडध्याचे युवराज पाटील, शिंदीचे डॉ. विलास पाटील, युवा सेनेचे लखीचंद पाटील, शहर प्रमुख अजय चौधरी, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, वाकचे स्वप्निल पाटील, अतुल पाटील, स्वरूप पाटील, रावसाहेब पाटील, उपतालुका प्रमुख अशोक पाटील, महेंद्र ततार आदी उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी सांगितले, की मतदारसंघातील सहकारी संस्था वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे मी व माजी आमदार दिलीप वाघ यांनी आवाहन केले होते. त्याला साद देत, खऱ्या भाजपने आमच्याशी एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. त्यातून सकारात्मक चर्चा झाली.
तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आमच्यासोबत एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काहींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मतदार देखील बाजार समितीच्या हितासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आपल्याला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
आम्ही विकास केला
आमदार किशोर पाटील यांनी सांगितले, की बाजार समिती जोपर्यंत आमच्या ताब्यात होती. तेव्हा आम्ही शेतकऱ्यांचे हित जोपासत बाजार समितीचा विकास केला. भडगाव, वरखेडी, कजगाव व नगरदेवळा येथील उपबाजारांचे बांधकाम केले. आज भडगावात अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
आम्ही नेहमी बाजार समितीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे हित जोपासले. विरोधकांनी मात्र बाजार समितीला लुटण्याचे काम केले. त्यांनी सुरवातीला पाचोरा बाजार समितीची ५० हजार स्केअर फूट जागा विकली व ती स्वत: घेतली. त्यानंतर बाजारभावाप्रमाणे तब्बल दहा कोटीची उर्वरीत ६० हजार स्केअर फूट जागेचे मूल्यांकन अवघे सव्वा चार कोटी दाखवले आणि ही जागा देखील विकण्याचा घाट त्यांनी घातला होता.
मात्र, उच्च न्यायालयातून या व्यवहाराला स्थागिती आणली. आहे. बाजार समितीत सत्ता आणून बाजार समितीची सर्व जागा विकण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, मतदार सुज्ञ असल्याने विरोधकांचा हा कुटील डाव साध्य होऊ देणार नाहीत असा आपल्याला विश्वास असून सर्वच्या सर्व १८ जागांवर आपलेच उमेदवार निवडून येतील. पाचोरा-भडगाव तालुक्यात झालेल्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद हे त्याचे द्योतक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
तालुक्यात ३८ पाणीपुरवठा योजना मंजूर
भडगाव तालुक्यात तब्बल ३८ गावांना ३५ कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्याचे सांगून आमदार पाटील यांनी सांगितले, की या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर होऊन त्यांची कामे सुरू झाली आहेत. सर्व योजनांचे भूमिपूजन केल्याचे मी जाहीर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पाचोऱ्यातही शंभर कोटी खर्चाच्या योजनांना मंजुरी मिळण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पन्नास वर्षांची टंचाई लक्षात घेता, या योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
खरी भाजप नेमकी कोणती?
आमदार किशोर पाटील यांना खरी भाजप नेमकी कोणती? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यांनी सांगितले की अमोल शिंदे यांना आम्ही भाजप मानत नाही. भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, माजी सभापती सुभाष पाटील, सदाशिव पाटील, डॉ. शांताराम तेली ही खरी भाजप आहे.
त्याच्यांशीच चर्चा करुन युती झाली असून ते आमच्यासोबत आहे. मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या सूचनेवरून आम्ही युती धर्म निभावला आहे. आमचे आपांपसात जागा वाटपही निश्चित झाले आहे. २० तारखेला शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीच्या जागा जाहीर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.